आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकरी संघटनांची 3400 उचलीची मागणी फेटाळली; सरकार 2550 रुपये दरासाठी तयार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- शेतकरी संघटना आणि सहकार मंत्री यांच्यात गुरुवारी सह्याद्री अतिथिगृहात पार पडलेली ऊस दराची बैठक निष्फळ ठरली.  २५५० रुपये प्रतिटन (हमीभाव) पेक्षा अधिक दर सहकारी साखर कारखाने देऊ शकत नाहीत, असे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी स्पष्ट केले. मात्र, ३४०० रुपये पहिला हप्ता दिल्याशिवाय कारखान्याला  ऊस देणार नाही, अशी भूमिका संघटनांनी घेतल्याने आजच्या बैठकीत तोडगा निघाला नाही.   

एक नोव्हेंबरपासून राज्यात ऊस गाळप हंगाम सुरू झाला आहे. मात्र, ऊसदराचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. यासंदर्भात राज्य सरकारने शेतकरी संघटनांना चर्चेला बोलावले होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या खासदार राजू शेट्टी यांनी ३४०० रुपये पहिली उचल देण्याची मागणी केली, तर महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटनेच्या रघुनाथ पाटील यांनी ३५०० रुपयांची मागणी केली अाहे. या प्रश्नावर सरकारला काेंडीत पकडण्याचेही प्रयत्न संघटनांकडून सुरू अाहेत. सहकार मंत्री सुभाष देशमुख म्हणाले, साखर कारखान्यातून पहिली उचल हमीभावानुसार म्हणजे २५५० रुपये दिली जाईल. दुसऱ्या उचलीपासून परिस्थिती पाहून कारखानदारांकडून भाव दिला जाईल. हमीभावापेक्षा साखर कारखान्यांनी अधिक भाव दिल्यास शासनाला कोणतीही अडचण नाही. गुजरात व उत्तर प्रदेश राज्यातील साखर कारखाने देत असलेला हमीभाव आणि इथेनॉलच्या दराबाबत अभ्यास करण्यासाठी राज्याचे एक अभ्यास मंडळ त्या राज्यात पाठवण्यात येईल. अभ्यास मंडळाकडून १५ दिवसांत अहवाल मागून निर्णय घेण्यात येईल.   
 
राज्यमंत्री सदाशिव खोत, देशमुखांत एकवाक्यता नाही  
सहकार राज्यमंत्री सदाशिव खोत यांनी चर्चेच्या मार्गाने ऊस दराचा प्रश्न सोडवला जाईल. त्यासाठी िजल्ह्याजिल्ह्यात िजल्हाधिकारी आणि शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी चर्चा करतील, असे सांगितले. सहकार मंत्री देशमुख आणि सहकार राज्यमंत्री खोत यांच्यात ऊस दराबाबत एकवाक्यता नसल्याचे या बैठकीत दिसून आले.  आठ नोव्हेंबर रोजी पुन्हा बैठक बोलावली असून त्यात तोडगा काढला जाईल, असे देशमुख यांनी सांगितले. तोडगा निघेपर्यंत राज्यातील ऊस दराचे आंदोलन चालूच राहील, असे रघुनाथ पाटील यांनी स्पष्ट केले. बैठकीला कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार राजू शेट्टी, साखर आयुक्त संभाजी कडू पाटील, महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघ मुंबईचे उपाध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, शेतकरी संघटनेचे रघुनाथदादा पाटील, अनिल घनवट, रयत संघटनेचे सुरेश पाटील आदी उपस्थित होते.   
 
साखर कारखान्यांचे  काटे संघटना तपासणार   
राज्यातील अनेक  साखर कारखाने वजनकाटे मारत असल्याच्या तक्रारी या वेळी संघटनांनी केल्या. त्यानंतर वजन काटे तपासणीसाठी जिल्हास्तरावर असलेल्या समितीमध्ये शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधीचासुद्धा समावेश करण्यात येईल, असेही सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...