आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिना बोरा हत्याकांडःपोलिसांची फेरचौकशी, शिना म्हणाली होती माझ्यासुखाचा विचार कर!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- बहुचर्चित शिना बोरा हत्याकांडात रायगड पोलिसांनी प्रथम चौकशी अहवाल (एफआयआर) का नोंदवला नाही, याची पुन्हा चौकशी करण्याचा आदेश राज्य सरकारने पोलिस महासचंलाक प्रवीण दीक्षित यांना दिला आहे. आधीच्या अहवालावर राज्य सरकार समाधानी नसल्यानेे चौकशी करून १५ दिवसांत अहवाल देण्यास सांगितले.

पेणच्या जंगलात २३ मे २०१२ रोजी शीना बोराचा मृतदेह सापडूनही पोलिसांनी एफआयआर नोंदवला नाही किंवा आकस्मिक मृत्यूची नोंद केली नाही. माजी पोलिस महासंचालकांनी एक पानाचा चौकशी अहवाल सादर केला आहे, मात्र त्यावर आम्ही समाधानी नाही, असे अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) के. पी. बक्षी यांनी सांगितले.
शिनाचा इंद्राणीला ई-मेल, माझ्यासुखाचा विचार कर!
शिना बोरा सावत्रभाऊ राहुल मुखर्जीबरोबर डेटिंग जाऊ लागल्यावर कुटुंबातील दरी वाढल्यानंतर शिनाने आई इंद्राणीला ई-मेल केला होता. राहुलबरोबर मी सुखी आणि सुरक्षित आहे. ही गोष्ट आपल्या पोटच्या गोळ्यासाठी तुला महत्त्वाची वाटत नाही का? जीवनात सुख मिळवण्यासाठी तू वाट्टेल ते केले आहेस... मलाही तो अधिकार आहे. त्यामुळे तू इतकी निराश का आहेस? मी तुझी मुलगी आहे... माझ्यात तुझ्यातलेच काहीतरी आहे... मला माझा मार्ग निवडू दे वआनंदाने राहू दे... असे या मेलमध्ये म्हटल्याचे सीबीआयच्या आरोपपत्रात म्हटले आहे.