आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘शीना हत्येची पीटरला वेळाेवेळी माहिती हाेती’, सीबीअायच्या दुसऱ्या अाराेपपत्रात माहिती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - शिना बोरा हत्याकांडाबाबत इंद्राणी ही पती पीटर मुखर्जीला वेळावेळी माहिती देत होती, असे सीबीआयने शुक्रवारी दुसऱ्या आरोपपत्रात म्हटले आहे.

इंद्राणीचा पहिल्या पतीपासून झालेला मुलगा मिखाइल याने चाैकशीत सांगितले, की, इंद्राणी आणि सिद्धार्थ दास गुवाहाटीत बेकरीचा व्यवसाय करायचे. एक दिवस दोघांत भांडण झाले. त्यामुळे दोघे घर सोडून गेले. त्यानंतर मला व शिनाला आजीकडे नेऊन साेडले. इंद्राणीने आपल्या आई-वडिलांवर आम्हाला दत्तक घेण्यासाठी दबाव निर्माण केला. त्यानंतर इंद्राणी अनेक वर्षे गायब झाली. काही वर्षांपूर्वी इंद्राणीचा पीटरसोबत वृत्तपत्रात फोटाे पाहिल्यानंतर पालकांनी संपर्क करून मिखाइल आणि शिनाच्या शिक्षणासाठी पैसे मागितले.
इंद्राणी पैसे देण्यासाठी तयार झाली. मात्र, दोन्ही मुले आपल्याला आईऐवजी बहीण संबोधतील, अशी अट तिने ठेवली. त्यानंतर मिखाइल बंगळुरू तर शिना मुंबईत राहण्यास आली. इंद्राणीच्या वर्तवणुकीने शिना त्रस्त होती. शिना आणि पीटरचा मुलगा राहुल यांच्यात प्रेम होते. ते इंद्राणी आणि पीटरला मान्य नव्हते. त्यामुळे इंद्राणीने दुसरा पती संजीव खन्ना आणि चालक श्यामवर राय याच्या मदतीने शिनाची एप्रिल २०१२ मध्ये हत्या केली.’
बातम्या आणखी आहेत...