आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाराज बंडोबांना शिवसेनेची विविध पदांची ऑफर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबई महापालिका निवडणुकांसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असलेल्या कट्टर शिवसैनिकांना तिकीट न दिल्याने शिवसेनेत बंडखोरी उफाळली. सत्ता प्राप्त करायची असेल तर बंडखोरांना शांत करणे आवश्यक असल्याने शिवसेनेकडून बंडखोरांना विविध पदांची ऑफर दिली जात असल्याचे सांगण्यात येत आहे. यासाठी खासदार राहुल शेवाळे प्रयत्न करत आहेत. दुसरीकडे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी बंडोबांना कसे थंड करायचे हे आम्हाला ठाऊक आहे, असे वक्तव्य करत शिवसेनेतील बंडखोरांना धमकीच दिली आहे.
   
शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच दादर, लालबाग-परळमध्येच बंडखोरी झाल्याने शिवसेनेला मोठा फटका बसणार आहे. नाराज शिवसैनिकांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरले आहेत. 

मुंबई पालिकेवर भगवाच : कदम 
एकीकडे पदांचे आमिष दाखवण्यात येत असले तरी खास शिवसेना स्टाइलने धमक्याही दिल्या जात आहेत. रामदास कदम यांनी बंडखोरीबाबत बोलताना सांगितले, शिवसेनेतील बंडोबांना थंड करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जर ते थंड झाले नाहीत तर त्यांना त्यांची जागा दाखवून दिली जाईल. शिवसेना सोडून गेलेल्यांची काय अवस्था झाली आहे,  हे त्यांनी पाहिले आहे. मुंबईत शिवसैनिक नाराज नसून मुंबई महापालिकेवर भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही, असेही त्यांनी म्हटले.
बातम्या आणखी आहेत...