आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिरेक्यांसोबत शिवसेनाप्रमुखांचा फोटो; शिवसेना, मनसेचे नेते संतप्त

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सहकारी महिलेचा लैंगिक छळ केल्याचा आरोप असलेल्या तरुण तेजपाल प्रकरणानंतर तहलका हे नियतकालिक पुन्हा वादात सापडले आहे. १९९२-९३ च्या दंगलीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांना अतिरेक्यांच्या रांगेत बसवणारा लेख ‘तहलका’त प्रसिद्ध झाला असून त्यामुळे शिवसेना, मनसे संतप्त झाली आहे.

‘तहलका’च्या अंकात "हू इज द बिगेस्ट टेररिस्ट' या लेखात मुंबई दंगलींमधील बाळासाहेब ठाकरेंच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत बाळासाहेबांनी दहशतीचे राजकारण केल्याचा आरोप केला आहे. या वादग्रस्त लिखाणाविरोधात शिवसेनेने खार पोलीस ठाण्यात तर मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ठाण्यात संतप्त शिवसैनिकांनी या नियतकालिकाची होळी केली. नियतकालिकाच्या व्यवस्थापनाने माफी न मागितल्यास त्याची राज्यातील विक्री रोखू, असा इशाराही शिवसेनेने दिला आहे. राष्ट्रवादीचे अामदार जितेंद्र अाव्हाड यांनीही या लेखाचा निषेध करत विक्रेत्यांना हे अंकच न विकण्याचे अावाहन केले अाहे.

शिवसेनाप्रमुख महान देशभक्त
शिवसेनाप्रमुख महान देशभक्त होते. त्यांच्या नेतृत्वाला देशात मान्यता मिळाली होती. गेली ३५ वर्षे अाम्ही त्यांच्या नेतृत्वात काम केले अाहे. रावसाहेब दानवे, प्रदेशाध्यक्ष भाजप

कडक कारवाई करा
बाळासाहेब ठाकरे अामच्या गुरुस्थानी आहेत. त्यांच्या विरोधात असे विकृत लिहिणाऱ्यांविर राज्य सरकारने कडक कारवाई करावी. बाळा नांदगावकर, नेते, महाराष्ट्र नवनिर्माण सेना

दुर्लक्ष करणेच याेग्य
अापल्याच कार्यालयातील महिला सहकाऱ्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप केलेल्या तरुण तेजपालसारख्या माणसाचे हे नियतकालिक आहे. त्याच्याबद्दल काय बोलावे? हा जुनी मढी उकरून काढण्याचा उद्योग आहे. त्याकडे दुर्लक्ष करणेच योग्य. उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख

बाळासाहेबांबद्दल आदर
बाळासाहेब ठाकरे हे केवळ एका पक्षाचे नव्हे तर संपूर्ण राज्याचे नेते होते. त्यांच्याबद्दल लोकांच्या मनात आदर होता अाणि अाजही अाहे. त्यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य याेग्य नाही.
वारिस पठाण, आमदार, एमआयएम