आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनाप्रमुख ठाकरेंच्या स्मारकाचे विधेयक शिवसेनेच्या गैरहजेरीत मंजूर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब  ठाकरे यांच्या स्मारकासाठी मुंबई महापौरांच्या बंगल्याची  जागा देण्याच्या निर्णयावर विधानसभेत अखेर मंगळवारी शिक्कामोर्तब झाले. यासाठी राज्य सरकारने आणलेले विधेयक विधानसभेने एकमताने संमत करण्यात आले. हे विधेयक संमत होत असताना शिवसेनेचे मंत्री सभागृहात उपस्थित तर नव्हतेच, या पक्षाचा फक्त एक अामदार उपस्थित हाेता.  

बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्यासाठी  मुंबई महानगरपालिकेची जागा (महापौर बंगला) देण्यात यावी, यासाठी राज्य सरकारने मुंबई महानगरपालिका (सुधारणा) विधेयक २०१७ आणले होते. विधानसभेत मंगळवारी रात्री या विधेयकावर चर्चा होऊन हे विधेयक एकमताने संमत करण्यात आले. याबाबत  डिसेंबर, २०१६ मध्ये सरकारने आधीच अध्यादेश जारी केला होता. आता सरकारने याचे विधेयकात रूपांतर करून अाणि ते  विधिमंडळात संमत करून घेऊन बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा मार्ग मोकळा केला आहे.    
 
विधानसभेत या विधेयकावर झालेल्या चर्चेत गृह व नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील, भाजपचे आमदार राज पुरोहित आदींनी सहभाग घेतला. या वेळी शिवसेनेचे एकही मंत्री व वा राज्यमंत्री सभागृहात उपस्थित नव्हते. तसेच ६३ आमदारांपैकी केवळ नाशिकमधील सिन्नरचे आमदार राजा वाजे यांनी या विधेयकावर आपले मनोगत व्यक्त केले. शिवसेनेच्या नेत्यांची व आमदारांची अनुपस्थिती हा चर्चेचा विषय ठरला.    
शिवसेनेचे मंत्री व आमदार गैरहजर असताना हे विधेयक मंजूर करणे योग्य होणार नाही, असे दिलीप वळसे पाटील म्हणाले. मात्र, शिवसेनेकडून याविषयी संमती मिळाली असून हे विधेयक मंजूर करण्याला काहीच अडचण नाही, असे विधानसभा अध्यक्षांनी स्पष्ट केले.
 
मुख्यमंत्र्यांचे अाभार : रावते
दरम्यान, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले अाहे. हे विधेयक मंजूर केल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अाभारही मानले.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...