आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाळासाहेबांचे स्मारक होणार महापौरांच्या बंगल्यात, देवेंद्र फडणवीस-ठाकरे यांची घोषणा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी दादर येथील महापौर बंगल्याची निवड करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही घोषणा केली. मंगळवारी बाळासाहेब ठाकरे यांची तिसरी पुण्यतिथी होती.
तथापि, या बंगल्यात स्मारक बांधणे सहजसाध्य नाही. वारसा स्थळाचा दर्जा असल्याने बंगल्याची दुरुस्ती करणे शक्य नसल्याने आत बांधकाम कसे करणार हा प्रश्न आहे.
शिवसेनाप्रमुखांना आदरांजली अर्पण केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी उद्धव यांच्यासोबत महापौर बंगल्यात पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, आठ जागांच्या चाचपणीनंतर सर्वानुमते महापौर बंगल्याच्या जागेवर शिक्कामोर्तब करण्यात आले. महापौर बंगला ही वारसा वास्तू आहे. ती पाडून नव्याने बांधकाम करणार का, या प्रश्नावर ते म्हणाले, महापौर बंगला हेरिटेज वास्तू असल्याने ती न तोडता स्मारक उभारले जाईल. सीआरझेड आदी नियमांची पूर्ण परवानगी घेऊनच हे स्मारक उभारले जाईल.
पब्लिक ट्रस्ट स्थापणार
स्मारक उभारण्यासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या धर्तीवर पब्लिक ट्रस्टची स्थापना करण्यात येईल. उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली हा ट्रस्ट काम करील. या कामी त्यांना मुख्य सचिव व अन्य सरकारी अधिकारीही मदत करतील.