आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुर्ज खलिफा डिझाइन केलेल्या; कंपनीला शिवस्मारकाचे काम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- महाराष्ट्र सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या उभारणीचे काम कॅनडातील नोर या कंपनीला दिले जाण्याची शक्यता आहे. प्रोजेक्ट मॅनेजमेंट सल्लागार (पीएमसी) कंपनी म्हणून या कंपनीची निवड करण्यात आली आहे. जगातील सर्वात उंच म्हणून प्रसिद्ध असलेल्या दुबईतील बुर्ज खलिफाचे डिझाइन या कंपनीनेच केले होते हे विशेष.
१९०० कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पाच्या उभारणीसाठी तीन आंतरराष्ट्रीय कंपन्यांची निवड करण्यात आली होती. या तिन्ही कंपन्यांमध्ये भारतीय कंपन्यांची भागीदारी आहे. कॅनडातील नोर या कंपनीची पेंटाकल ही भारतीय कंपनी भागीदार आहे, तर यामध्ये स्ट्रप कन्सलटंट प्रा. लि व फेयरफोर्ड कन्सलटंट या अन्य दोन कंपन्यांचा समावेश आहे. सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. पी. एस. मीणा यांनी "दिव्य मराठी नेटवर्क'ला सांगितले की, तांत्रिक पातळीवर पेंटाकल व नोर यांची निवड करण्यात आली आहे. कारण नोरकडे जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफा तसेच समुद्रात अटलांटा सिटीचे डिझाइन तयार करण्याचा अनुभव आहे. या कंपनीला टेंडर देण्याबाबत ७ ऑगस्ट रोजी अंतिम निर्णय होणार आहे. मुंबईत अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासोबतच संग्रहालय, अॅम्पी थिएटर, डॉल्फिन अॅक्वेरियमची उभारणी केली जाणार आहे.