आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दादर, लालबाग प्रभागात शिवसेनेच्या गडाला खिंडार; भाजपचे पारडे जड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबई महानगरपालिकेची सत्ता स्वबळावर कायम राखण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले असतानाच पक्षातील बंडखाेरी त्यांच्यासाठी डाेकेदुखी ठरत अाहे. अनेक वर्षांपासून शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या लालबाग, परळ, दादरमध्येच पक्षाला ‘खिंडार’ पडले असून तीन विद्यमान नगरसेवकांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ केल्याने हा गड राखण्याचे उद्धव ठाकरेंसमाेर अाव्हान असेल. वडाळ्यात तर नाराज निष्ठावंतांना तिकीट न मिळालेल्या नाराज शिवसैनिकांनी शिवसेना शाखेलाच टाळे ठाेकून संताप व्यक्त केला. दरम्यान, बंडखोरी झाली तरी शिवसेना महापालिकेवर भगवा फडकवेल असा विश्वास शिवसेना नेते व्यक्त करीत आहेत. 
  
प्रभाग १९८ चे ज्येष्ठ नगरसेवक नाना आंबोले यांचा वॉर्ड महिलांसाठी राखीव झाल्याने त्यांनी आपल्या पत्नीसाठी तिकीट मागितले होते. परंतु आमदार अजय चौधरी यांनी ही मागणी धुडकावून लावल्यामुळे नाराज झालेल्या अांबाेले यांनी भाजपची वाट पकडली. नाना आंबोले यांचे लालबाग-परळमध्ये चांगले काम असून त्यांचा व्यक्तिगत संपर्कही दांडगा अाहे. त्यांच्या पक्षत्यागाचा शिवसेनेला माेठा फटका बसू शकताे.  दुसरीकडे, गोवंडीचे विद्यमान नगरसेवक दिनेश पांचाळ यांचे तिकीट कापून या प्रभागात खासदार राहुल शेवाळे यांनी अापली  पत्नी कामिनी शेवाळे यांच्यासाठी उमेदवारी मिळविल्याने नाराज झालेले पांचाळ यांनीही भाजपत प्रवेश करणे पसंत केले. 
 
युवा सेनेचे अध्यक्ष व उद्धव ठाकरेंचे पुत्र आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय,  युवा सेना कोशाध्यक्ष अमेय घोले यांना वॉर्ड क्रमांक १८७ मधून उमेदवारी देण्यात अाली. मात्र त्यांच्या उमेदवारीला विराेध करत  वडाळ्यात शिवसैनिकांची निदर्शने करीत शिवसेना शाखेलाच टाळे ठोकले. या ठिकाणी माधुरी मांजरेकर इच्छुक होत्या. महत्त्वाचे म्हणजे माजी महापौर शुभा राऊळ यांना पक्षातर्फे तिकीट देण्यात आले असतानाही त्यांनी शिवसेना नेते विनाेद घोसाळकर यांच्याविरोधात नाराजी व्यक्त करीत निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे.  पक्षात बंडखोरी उफाळून येण्याचा धाेका लक्षात अाल्याने शिवसेनेकडून विभागप्रमुखांकडे एबी फॉर्म देण्यात अाले. अर्ज भरण्याचा शुक्रवार शेवटचा दिवस आहे.   

महापाैर स्नेहल अांबेकर यांच्या उमेदवारीला विराेध
शिवसेनेच्या विद्यमान महापाैर स्नेहल अांबेकर यांना पूर्वी प्रभाग १९८ मधून उमेदवारी जाहीर केली हाेती, मात्र स्थानिक शिवसैनिकांच्या तीव्र राेषामुळे त्यांना प्रभाग १९५ मधून तिकिट देण्यात अाले. मात्र तिथेही हाच प्रकार घडला.  अांबेकरांच्या उमेदवारीला विराेध करण्यासाठी वरळीत माेठ्या संख्येने शिवसैनिक रस्त्यावर उतरले हाेते. विभागप्रमुख अाशिष चेंबूरकर यांच्या कार्यालयावरही त्यांनी धडक दिली. दुसरीकडे, शिवसेनेने यंदा काही दिग्गजांना उमेदवारी नाकारून नव्या चेहऱ्यांना संधी दिली. तसेच आयत्यावेळी पक्षात आलेल्यांनाही तिकिट देण्यात अाले. त्यामुळे निष्ठावंतांत नाराजी अाहे. भाजपमधून आलेल्या मंगल भानुशाली यांना सेनेने घाटकोपरमधून तिकीट दिले. सात रस्ता येथेही शिवसैनिकांचा विरोध डावलून नगरसेविका किशोरी पेडणेकरांना उमेदवारी दिल्याने शिवसैनिकांनी पेडणेकरांना मदत न करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.

पक्ष साेडणाऱ्यांचा राेष अामदार- खासदारांवर
मुंबई महापालिका निवडणूक प्रतिष्ठेची केलेल्या भाजपने गुरुवारी तीन प्रमुख नेते गळाला लावून शिवसेनेला माेठे खिंडार पाडले अाहे.  नाना आंबोले, िदनेश पांचाळ तसेच प्रभाकर िशंदे या शिवसेनेतील नाराज नेत्यांना अापल्या पक्षात अाेढण्यात मुंबई भाजपचे अध्यक्ष अाशिष शेलार यशस्वी झाले असून त्यामुळे शिवसेनेच्या पारंपरिक गडांवर भाजपचे बळ वाढण्याची अाशा निर्माण झाली अाहे. ‘स्थानिक अामदार अजय चाैधरींनी मला संपवण्याची भाषा केली. त्यामुळे मला पक्ष साेडावा लागला. आता त्यांना  काय आहे ते कळेल’, असा संताप आंबोले यांनी व्यक्त केला.  अाता भाजप अांबाेले व त्यांच्या पत्नी तेजस्विनी या दाेघांनाही उमेदवारी देणार अाहे. 
 
तर खासदार राहुल शेवाळेंमुळे अापल्यावरअन्याय झाल्याची भावना दिनेश पांचाळ यांनी व्यक्त केली. ‘मातोश्री’बाबत आपल्या मनात आज आणि उद्याही आदर आहे आणि राहील, पण शेवाळे यांचे ‘माताेश्री’वर वजन असल्याने शिवसेनेत आमचे म्हणणे एेकून घेत नाही’, अशी त्यांची खंत अाहे. 
बातम्या आणखी आहेत...