आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अाशिष शेलारांचा अाराेप: भाजपला पराभूत करण्यासाठी शिवसेना-काँग्रेसमध्ये फिक्सिंग (महाकौल)

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपला पराभूत करण्यासाठी शिवसेनेने काँग्रेसबरोबर ‘संधान’ साधून ४२ प्रभागांत एकमेकांना पूरक उमेदवार दिले आहेत, असा आरोप मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी रविवारी केला.   

हुतात्मा स्मारकाला अभिवादन करत भाजपने रविवारी आपल्या मुंबईतील प्रचाराची सुरुवात केली. या वेळी भाजप व मित्रपक्षांच्या २२७ उमेदवारांनी हुतात्मा स्मारकाला अभिवादन केले. त्यानंतर यशवंतराव चव्हाण सेंंटरमध्ये सर्व उमेदवारांचा मेळावा घेऊन प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत पारदर्शी व भ्रष्टाचारमुक्त कारभाराची शपथ घेण्यात अाली.  
भाजपची ही प्रचाराची सुरुवात नसून विजयी मेळावा असल्याचे सांगत शेलारांनी उमेदवारांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न केला. ‘एक कोटी, ४० लाख लोकसंख्या असलेल्या मुंबईच्या कारभारासाठी महापालिकेचे बजेट ३७ हजार कोटी आहे अाणि तो कारभार सांभाळण्यासाठी तुम्ही जाणार आहात. मात्र काम करताना स्वहितापेक्षा पक्ष अाणि पक्षहितापेक्षा मुंबईचे हित महत्त्वाचे असेल, हे लक्षात ठेवा. पारदर्शक अाणि भ्रष्टाचारविरहित कारभाराची मुहूर्तमेढ रोवणारा आपला जाहीरनामा असणार आहे. अपेक्षाभंग केलेले लोक एका बाजूला अाणि अपेक्षा पूर्ण करू शकणारे मुख्यमंत्री व भाजपचे लोकप्रतिनिधी दुसऱ्या बाजूला असा मुकाबला असून आता आपल्याला पराभूत करण्याची हिंमत कोणी करू शकत नाही’, असे शेलारांनी ठणकावले.    
 
भाजप उमेदवारांनी घेतली शपथ  
मुंबई महाराष्ट्रापासून ताेडण्याचा भाजप प्रयत्न करत अाहे, असा अाराेप विराेधकांकडून केला जात अाहे. तो दावा खोडून काढण्यासाठी भाजपनेही शपथेचे भावनिक आवाहन करत नव्या रणनीतीची सुरुवात केली. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी उपस्थित २२७ उमेदवारांना शपथ दिली.
 
‘छत्रपती शिवाजी महाराज व डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना स्मरून मी आज खरा मुंबईकर म्हणून शपथ घेतो की मी मुंबई महापालिकेचा नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर मुंबईकरांना पारदर्शक व भ्रष्टाचारमुक्त कारभार देण्यास कटिबद्ध राहीन. मी माझी मालमत्ता व उत्पन्नाची माहिती दरवर्षी जाहीर करेन. मी मुंबईकरांचे प्रश्न सोडवण्यासाठी सतत कार्यरत राहीन,’ अशी शपथ सर्व उमेदवारांनी घेतली. 
 
पुढील स्लाइडवर वाचा, वैयक्तिक आरोपातून सत्ता मिळणार नाहीच : दानवे ...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
 
बातम्या आणखी आहेत...