आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप’ खिशातील पैसे काढून घेणारे पाकीटमार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची टीका (महाकौल)

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘नोटाबंदीमुळे कोट्यवधी लोक बेरोजगार झाले. ज्यांच्या नोकऱ्या आणि जीव गेले त्यांचे नुकसान तुम्ही कसे भरून देणार? लोकांच्या खिशातले पैसे काढून घेणारे तुम्ही पाकीटमार आहात’, अशी खरमरीत टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी भाजपला उद्देशून केली. 

भांडुप येथील प्रचारसभेत ते बाेलत हाेते. भाजपने दिलेल्या ‘अच्छे दिन’च्या आश्वासनाचा धागा पकडून ठाकरे म्हणाले, नोटबंदी हे भाजप सरकारने लादलेले संकट आहे. या निर्णयामुळे काळा पैसा दहशतवाद थांबेल, असे आश्वासन देण्यात आले होते; पण अजूनही दहशतवादी हल्ले सुरूच आहेत. या निर्णयामुळे रांगेत उभे राहिलेल्या अनेकांचे मृत्यू झालेत. कोट्यवधी लोकांच्या नोकऱ्या गेल्या.
 
 या लोकांचे नुकसान भाजप कसे भरून देणार, असा सवाल करत उद्धव ठाकरे म्हणाले, नोटाबंदीच्या निर्णयानंतर राज्यात बेरोजगारी वाढली आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उभा राहिला. नोटाबंदीच्या निर्णयाप्रमाणेच भाजपचा पारदर्शकतेचा मुद्दा हेसुद्धा एक थोतांड असल्याचा आरोप उद्धव यांनी केला. 
 
बातम्या आणखी आहेत...