आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'लढाई तर सुरूच राहील..\', शिवसेनेने \'सामना\'तून दिले भाजपपासून दूरच राहण्याचे संकेत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - निकाल लागल्यापासून किंबहुना प्रचार संपल्यापासूनच भाजपने शिवसेना आमचा वैचारिक मित्र असल्याचे सांगत सत्तेसाठी एकत्र येण्याचा मार्ग खुला ठेवला होता. पण शिवसेना मात्र सध्या तशा कोणत्याही मूडमध्ये नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. गुरुवारी निकालानंतर शिवसेना पत्रप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईचा महापौरच काय पुढचा मुख्यमंत्रीही शिवसेनेचाच असेल, असे म्हणत वेगळ्या समिकरणांचे संकेत दिले होते. त्यात शुक्रवारी शिवसेनेचे मुखपत्र सामनामधूनही भाजपवर सत्तेचा वापर करून विजय मिळवल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच शिवसेना भाजपपासून काही हात दूरच राहणार असल्याचे संकेतही सामनाच्या अग्रलेखातून देण्यात आले आहेत. 

सामनाच्या अग्रलेखातील मुद्दे...
- सत्ता आणि संपत्तीच्या बळावर भारतीय जनता पक्षाने नक्कीच मुसंडी मारली आहे. पण जंग जंग पछाडूनही त्यांना शिवसेनेचा पराभव करता आला नाही. 
- शिवसेनेचा पराभव करण्यासाठी ‘महाराष्ट्रा’ची संपूर्ण सत्ता, दिल्लीची जोरदार कुमक व त्याबरोबर मिळणारी साधने मैदानात उतरवूनही शिवसेना एका योद्धय़ाप्रमाणे लढली हे महत्त्वाचे. 
- गेल्या पन्नास वर्षांपासून मुंबईवर आणि पंचवीस वर्षांपासून मुंबईच्या महानगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता होतीच. त्या सत्तेला व भगव्याला सुरुंग लावून महाराष्ट्र अस्थिर करण्याचा प्रयत्न आज जितक्या ‘कारस्थानी’ पद्धतीने झाला तो काँग्रेस राजवटीतही झाला नसेल. 
- देशाचा कौल काय आहे ते मुंबई-ठाण्याच्या जनतेने स्पष्ट केले. येथे ‘मन की बात’ चालत नाही तर फक्त ‘काम की बात’ चालते. शिवसेनेने मुंबईत विकासाचे काम केले. 
- काही झाले तरी मुंबईत शिवसेनेचाच महापौर विराजमान होईल. त्यासाठीच शेवटी ही लढाई झाली. 
- मुंबईतील १२ लाख मतदारांची नावे गहाळ झाली व त्यातील बहुसंख्य मतदार मराठीच होते. हा घोळ सत्तेचा वापर करून ‘ठरवून’ झाला काय? 
- महापालिका त्रिशंकू दिसत असली तरी मुंबईकरांचा कौल हा शिवसेनेच्याच बाजूने आहे. 
- ठाणे महानगरपालिकेत जंग जंग पछाडूनही भाजपला शिवसेनेचा पराभव करता आला नाही व ठाण्यात शिवसेनेने एकहाती सत्ता आणली. 
- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकांत भाजपने चांगली कामगिरी करून दाखवली हा काँग्रेस-राष्ट्रवादीला धक्का आहे. 
- सत्तेवर बसल्याचे फायदे त्या त्या राजकीय पक्षाला नेहमीच मिळत आले. काँग्रेस सत्तेवर असताना हा लाभ काँग्रेसला मिळत आला. आता ही ऊब भाजपला मिळत आहे. 
- शिवसेनेने निखाऱयावरून चालण्याचा मार्ग स्वीकारला आहे. परिणामांची पर्वा आम्ही करीत नाही. लढाई सुरूच राहील. 
- युद्धाला तोंड फुटले आहे ते फक्त सत्तेसाठी नाही तर धर्म आणि विचारांसाठी, महाराष्ट्राच्या अस्मितेसाठीच!
(मजकूर 'सामना'मधून साभार)
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...