आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शिवसेना आक्रमक, घोषणेपर्यंत सभागृह चालू न देण्याचे 'आदेश'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भाजपने उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत जाहीरनाम्यात शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची घोषणा केली होती. त्या घोषणेपासूनच विरोधकांसह सत्ताधारी शिवसेनाही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आक्रमक झाली आहे. किंबहुना शिवसेनेनेच भाजपवर याविषयी विरोधकांपेक्षा अधिक टीका केलेली आहे. त्यात आता अर्थसंकल्पीय अधिवेशनात जोपर्यंत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा होत नाही, तोपर्यंत सभागृहाचे कामकाज चालू देऊ नका असे आदेशच शिवसेना पक्षप्रमुखांनी दिल्याची माहिती मिळत आहे. 

राज्य मंत्रीमंडळात मंत्री असणारे रामदास कदम यांनी स्वतः ही माहिती माध्यमांशी बोलताना दिली आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी होईपर्यंत अधिवेशन चालू देऊ नका, असे आदेश स्वतः उद्धव ठाकरे यांनी दिल्याचे रामदास कदम यांनी सांगितले. 

जिल्हा परिषदेत शिवसेना काँग्रेस, राष्ट्रवादीबरोबर!
राज्यांतील जिल्हा परिषदांमध्ये जरी भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या असल्या तरी जिल्हा परिषद अध्यक्षपदापासून भाजपला दूर ठेवण्यासाठी शिवसेनेने कंबर कसल्याचे दिसते आहे. शिवसेनेने स्थानिक नेत्यांनी जिल्हा परिषदांत स्थिती पाहून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर चर्चा करण्याचे आदेश दिल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, मुंबईत भाजपने शिवसेनेला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. त्यामुळे शिवसेना पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजपला पाठिंबा देणार आहे. जिल्हा परिषदांसाठी मात्र शिवसेनेने वेगळीत तयारी केल्याचे समोर येतेय. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...