सध्या सबंध महाराष्ट्रात केवळ एकच चर्चा आहे, ती म्हणजे केवळ मराठा मोर्चाचीच. या मोर्च्याच्या मागे कोणाचे डोके आहे, त्याचे नेतृत्व, नियोजन कोण करत आहे, अगदी शिस्तीत आणि संपूर्ण जगासमोर आदर्श ठरलेल्या या विराट आंदोलनासाठी लाखो लोक जमतात तरी कसे, हेच आणि इतर प्रश्न सर्वांनाच पडले आहेत. त्याचा divyamarathi.com ने घेतलेला धांडोळा...
कशी होते मोर्चेबांधणी
क्रांती दिनी औरंगाबादमध्ये पहिल्यांदा मराठा क्रांती (मूक) मोर्चाला निघाला. त्या नंतर जवळगाव, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, जालना, अकोल्यासह पश्चिम महाराष्ट्रातील काही तालुक्यांमध्ये विराट मोर्चे निघाले. औरंगाबादेत निघालेल्या पहिल्या मोर्चात 4 ते 5 लाख मराठा बंधू - भगिनींनी सहभाग नोंदवला. त्यानंतरच्या प्रत्येक मोर्चात हा आकडा दुप्पट तिप्पट झाला. या आंदोलनात लाखो लोक असतानाही कुठेच शांततेचा किंवा कायद्याचा भंग झाला नाही, हे विशेष.
पुढील स्लाइड्सवर वाचा, मोर्च्यांचे नियोजन नेमके कसे केले जात आहे...