आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मार्ट अमरावतीसाठी हेवलेट पॅकर्डशी करार, राज्यात डिजिटल क्षमतेची स्मार्ट शहरे विकसित होणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई/अमरावती- राज्यातील शहरे स्मार्ट डिजिटल क्षमतेची करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असून त्याअंतर्गत अमरावतीसह दहा शहरे स्मार्ट सिटीअंतर्गत विकसित करण्यात येणार आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथे केले.
राज्यातील शहरे डिजिटल स्मार्ट सिटी करण्यासंदर्भात राज्य शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभाग हेवलेट पॅकर्ड इंटरप्रायझेस (Hewlett Packard Enterprise) ही जागतिक कंपनी यांच्यात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विधानभवनात सामजंस्य करार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्य शासनाच्या वतीने माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव विजयकुमार गौतम हेवलेट पॅकर्ड इंटरप्रायझेसच्या वतीने उपाध्यक्ष सोम सत्संगी यांनी करारावर स्वाक्षरी केली. यावेळी मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ धवसे, व्यवसाय प्रमुख तांत्रिक सल्लागार रविंद्र रानडे, तांत्रिक प्रमुख लक्ष्मीकांत राव, उत्पादन प्रमुख मोहित मंडविया, संचालक सचिन नाईक-निंबाळकर, सत्यजित नाईक-निंबाळकर, संचालक (सीआयएसआर) अंबरीश बकाया आदी उपस्थित होते. राज्यातील अमरावती, औरंगाबाद नाशिक ही शहरे स्मार्ट शहरे करण्यासाठी ही कंपनी तांत्रिक सहाय्य भांडवल पुरविणार आहे.

लोकांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न
मुख्यमंत्रीम्हणाले की, स्मार्ट सिटी अभियानात हेवलेट पॅकर्ड इंटरप्रायझेस ही कंपनी सहभागी होत असल्याचा आनंद आहे. या माध्यमातून लोकांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न शासन करीत आहे. राज्य शासनाने राज्यातील आठ हजार गावे डिजिटल व्हिलेज करण्याचे ठरविले असून त्याची सुरुवात झाली आहे. भारत नेट प्रकल्पाअंतर्गत ऑप्टिकल फायबर नेटवर्कने ही गावे जोडण्यात येणार आहेत. यामध्ये मेडिसीन, एज्युकेशनची सुविधा देण्यात येणार असल्याचेही गौतम यांनी या वेळी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...