आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नितीन आगे खटल्यास हायकाेर्टात आव्हान देऊ : सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडाेले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- अहमदनगर जिल्ह्यातील दलित युवक नितीन आगे हत्या प्रकरणातील तिन्ही आरोपींना पुराव्याअभावी सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे. या निकालाला हायकोर्टात आव्हान देऊ, असे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी सांगितले.  


दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्यात २०१५ च्या तरतुदीनुसार हा खटला चालला आहे की नाही, तसेच अॅट्रॉसिटी कायद्यात दलित अत्याचारासंदर्भात विशेष न्यायालयात खटला चालवण्याची ही तरतूद केली आहे. प्रकरणात विशेष न्यायालयाची स्थापना करण्यात का आली नाही, याबाबत काही अधिकाऱ्यांनी हलगर्जीपणा दाखवला आहे का, याचीही चौकशी करण्यात येईल, असे बडोले यांनी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...