आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फवारणीतील मृत्यूंच्या यादीत आत्महत्या केलेल्यांची नावे; एसआयटी चौकशीतून उघड

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- यवतमाळ जिल्ह्यात कीटकनाशकांच्या फवारणीमुळे २१ शेतकरी व मजुरांचा मृत्यू झाल्याचे आकडेवारी सांगत असली तरी या प्रकरणाच्या एसआयटी चौकशीत या यादीमध्ये आत्महत्या केलेल्या ४ शेतकऱ्यांची नावे घुसडण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. सोमवारी हा एसआयटी चौकशीचा अहवाल सादर केला जाणार असून गृह आणि आरोग्य विभागाच्या गलथान कारभारावर या अहवालात ताशेरे ओढले असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. या गंभीर प्रकरणात स्थानिक अधिकाऱ्यांवर काय कारवाई केली जाणार याकडे आता लक्ष लागले आहे.


कीटकनाशक फवारणीत मोठ्या प्रमाणावर शेतकरी आणि मजूर मृत्युमुखी पडल्याने हे प्रकरण देशभर गाजले होते. प्रकरणाची व्याप्ती पाहता शेवटी मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची एसआयटी (उच्चस्तरीय चौकशी समिती) नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. प्रत्यक्षात २१ पैकी सर्व २१ जण कीटकनाशक फवारणीत मरण पावले नसून ४ जण हे आत्महत्या केलेले शेतकरी आहेत. तसेच १४ जणांच्या शवविच्छेदनात त्यांच्या शरीरात कुठलेही घातक कीटकनाशकाचे अंश आढळून आलेले नाहीत, असेही अहवालातून समोर येणार असल्याचे समजते.

बातम्या आणखी आहेत...