आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यंदाच्या पावसाळ्यात ‘एसडीअारएफ’ची मदत, राज्य अापत्ती निवारण दलाचे 428 जवान सज्ज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
मुंबई - महाराष्ट्रात प्रथमच स्थापन करण्यात अालेल्या राज्य अापत्ती निवारण दलाचे (एसडीअारएफ) ४२८ जवान प्रशिक्षण घेऊन सज्ज झाले अाहेत. येत्या जून महिन्यापासून या जवानांची पहिली बॅच महाराष्ट्रातील जनतेच्या संरक्षणासाठी सज्ज हाेणार अाहे. नागपूर व धुळे या दाेन ठिकाणी ‘एसडीअारएफ’चे जवान तैनात राहतील. ते विदर्भ व खान्देशात उद‌्भवणाऱ्या नैसर्गिक व इतर संकटांत मदत करतील. तर पश्चिम महाराष्ट्र, काेकण व इतर विभागांना मात्र ‘एनडीअारएफ’कडूनच मदत मिळेल.  

३० जुलै २०१४ राेजी पुणे जिल्ह्यातील माळीण हे छाेटेसे गाव भूस्खलनामुळे उद‌्ध्वस्त झाले हाेते. या नैसर्गिक संकटात सुमारे १५० हून अधिक लाेकांना प्राण गमवावे लागले. या काळात राष्ट्रीय अापत्ती निवारण दलाच्या (एनडीअारएफ) जवानांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करत अनेकांचे प्राण वाचवले हाेते. या पार्श्वभूमीवर  ‘एनडीअारएफ’च्या धर्तीवर राज्यातही ‘एसडीअारएफ’ची स्थापना करण्याचा निर्णय तत्कालीन सरकारने घेतला हाेता. त्यानुसार ४२८ जवानांची भरती करण्यात अाली हाेती. या जवानांना ‘एनडीअारएफ’च्या जवानांनी नागपूरमध्ये प्रशिक्षण दिले अाहे. ही बॅच अाता जनतेच्या संरक्षणासाठी सज्ज झाली असून जून महिन्यापासून हे जवान दाेन गटांत विभागले जातील.  यापैकी काही जवान नागपूरच्या कॅम्पमध्ये तैनात असतील, ते विदर्भातील संकटकाळात मदतीला धावतील. तर धुळे येथील कॅम्पमध्ये तैनात राहणारे जवान उत्तर महाराष्ट्रात संकटकाळात मदत करतील. 
 
पूरग्रस्तांना मदत  
यंदाच्या पावसाळ्यात महापूर किंवा जलसंकट उद‌्भवल्यास तेथील लाेकांच्या संरक्षणासाठी नव्या दमाचे ‘एसडीअारएफ’चे जवान तैनात असतील, अशी माहिती या विभागातील अधिकाऱ्याने दिली. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर अाम्ही सर्व जिल्ह्यांतील प्रशासकीय यंत्रणेला त्यांची टीम सज्ज ठेवण्यास सांगितले अाहे.  ‘एसडीअारएफ’मध्ये दरवर्षी गरजेनुसार जवान व अधिकाऱ्यांची भरती राज्यातूनच केली जाणार अाहे.
बातम्या आणखी आहेत...