आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धोनी बरोबरचे अफेयर म्हणजे जीवनावर लागलेला \'डाग\', वाचा कोण म्हणाली असे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तमिळ अभिनेत्री लक्ष्मी राय. - Divya Marathi
तमिळ अभिनेत्री लक्ष्मी राय.
मुंबई - चेन्नईतील अभिनेत्री लक्ष्मी राय हिने 'एमएस धोनी- द अनटोल्ड स्टोरी' चित्रपटात तिचा उल्लेख असणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. 30 सप्टेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होत असल्याने लक्ष्मी राय आणि धोनीच्या अफेयरचे किस्से पुन्हा एकदा चर्चेत आहेत. काही वर्षांपूर्वी धोनी आणि लक्ष्मी यांच्या अफेयरच्या अनेक बातम्या आल्या होत्या. 2008 मध्ये आयपीएल दरम्यान लक्ष्मी आणि धोनीच्या डेटींगच्या बातम्याही आल्या होत्या.

आम्ही सर्व विसरलो लोक मात्र तिथेच अटकलेले...
लक्ष्मी म्हणाली मी आणि धोनी यातून बाहेर निघालो आहोत. लोक मात्र अजूनही त्याठिकाणी अडकलेले आहेत. या सर्वाला आता 8 वर्षे लोटली आहेत. लक्ष्मी म्हणाली मी तेव्हा टीमची ब्रँड अॅम्बेसेडर होती. तो टीममध्ये असल्याने आम्ही एका वर्षापेक्षाही कमी काळ सोबत होतो. आम्ही कधीही एकमेकांना कमिटमेंट केले नाही आणि लग्नाचा विषयही काढला नाही. या चित्रपटात धोनीची पहिली गर्लफ्रेंड प्रियंका झा हिचा उल्लेख आहे.

आमचे नाते एखाद्या डागाप्रमाणे..
काही वर्षांपूर्वी एका इंग्रजी वृत्तपत्राशी चर्चा करताना लक्ष्मी राय म्हणाली होती की, एवढ्या दिवसांनंतरही धोनीचे नाव निघाले की माझे नाव घेतले जाते. आजही आमच्या रोमान्सच्या अफवा उडतात. मला या सर्वाचा राग येतो. आमचे नाते एखाद्या डागाप्रमाणे वाटत आहे, असेही ती म्हणाली होती. धोनीनंतरही माझे तीन चार जणांशी नाते होते, पण त्याबाबत कोणी विचारत नाही, असेही ती म्हणाली.

पुढील स्लाइड्सवर पाहा, धोनीच्या या एक्स गर्लफ्रेंडचे काही PHOTOS
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...