आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्थसंकल्पीय अधिवेशन हीच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी योग्य वेळ, विरोधक आक्रमक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - शेतकरी कर्जमाफीसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशन हीच योग्य वेळ असल्याचे सांगत या मागणीसाठी विरोधक  अधिक आक्रमक होणार असल्याचे संकेत विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत. विखे पाटील यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे हा इशारा दिला आहे. 

बुधवारी 15 मार्च रोजी सकाळी 10 वाजता विधानभवनात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक होणार आहे. या बैठकीत कर्जमाफीच्या मुद्द्यावर आक्रमण घोरण अवलंबण्याबाबत चर्चा होणार असल्याचे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. शेतकरी आत्महत्या रोखण्यात सरकारला सपशेल अपयश आले आहे. त्यामुळे आत्महत्या रोखण्यासाठी शेतकरी कर्जमाफी हाच पर्याय शिल्लक असल्याचे विखे पाटील म्हणाले.  

कर्जमाफी करण्याची सरकारलची प्रामाणिक इच्छा असेल तर, अर्थसंकल्पीय अधिवेशन ही अगदी योग्य वेळ आहे. सरकारने इच्छाशक्ती दाखवल्यास याच अधिवेशनात कर्जमाफीची आर्थिक तरतूद करणे शक्य होईल असेही राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.     
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
 
बातम्या आणखी आहेत...