आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भूक लागते तेव्हा लिंबू सरबत देऊन चालत नाही, खासदार सुप्रिया सुळेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘जेव्हा एखाद्याला भूक लागते तेव्हा त्याला िलंबू सरबत देऊन चालत नाही, जेवणच द्यावे लागते. आरक्षणासाठी लाखोंच्या संख्येने रस्त्यावर उतरलेल्या मराठ्यांना ईबीसी सवलत देऊन त्यांचे मूळ प्रश्न सुटणार नाहीत,’ असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शुक्रवारी मुख्यमंत्र्यांना लगावला. राज्यकर्त्यांना मराठा माेर्चांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

‘शेतीकडे फडणवीस सरकारचे दुर्लक्ष होत आहे. मोठ्या संख्येने शेतीवर अवलंबून असलेला मराठा समाज हवालदिल झाला आहे. त्यातच आरक्षणाअभावी नोकरी, िशक्षणात संधी िमळत नसल्याने त्याच्या निराशेत आणखी वाढ होत आहे. मराठा समाजाची कुटुंबेच उद्ध्वस्त होत असताना रस्त्यावर येत त्यांनी आपल्या मागण्यांना वाचा फोडली आहे. अशा वेळी त्यांचा सहानुभूतिपूर्वक िवचार करण्याची गरज आहे. मात्र सरकारकडून तशा काही हालचाली होताना िदसत नाहीत, असेही सुळे म्हणाल्या.
बातम्या आणखी आहेत...