आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्जमाफीसाठी रिपाइंचे राज्यव्यापी आंदोलन, महामंडळाकडील 636 कोटींची कर्जे थकीत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
मुंबई - दलित, आदिवासी, ओबीसी समाजाच्या बेरोजगारांनी  मागासवर्गीय आर्थिक विकास  महामंडळाकडून घेतलेली कर्जे माफ करावीत या मागणीसाठी रिपब्लिकन पक्ष २५ जुलै रोजी राज्यातील सर्व तहसील आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करणार आहे, अशी माहिती रिपाइंचे राष्ट्रीय सरचिटणीस  अविनाश महातेकर यांनी शनिवारी मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत केली.   
 
राज्यशासनाने शेतकऱ्यांचे  ३४ हजार कोटींचे कर्ज माफ केले.  त्याचे रिपाइंतर्फे स्वागत करण्यात आले आहे . त्याप्रमाणे राज्यातील मागासवर्गीय बेरोजगारांनी घेतलेले कर्ज शासनाने माफ करावे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ; महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ तसेच आदिवासी आर्थिक विकास महामंडळ आणि अपंग विकास महामंडळ या सर्व महामंडळाचे ६३६ कोटींचे कर्ज थकबाकीत आहे.   
 
बातम्या आणखी आहेत...