आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वरुण कश्यपला हिंदुंचा तिटकारा, द्वेषापोटी गोरक्षकांची खोटी तक्रार, अशी रचली Story

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - फिल्म एक्झिक्युटिव्ह वरुण कश्यपने काही महिन्यांपूर्वी एका रिक्षा ड्रायव्हरने त्याला शिविगाळ केल्याची तक्रार केली होती. गायीच्या कातड्याची बॅग वापरत असल्याच्या कारणावरून रिक्षावाल्याने शिविगाळ केली होती, अशी तक्रार त्याने केली होती. पण तो खोटं बोलत होता. हिंदुंचा तिटकारा असल्यामुळे केवळ जातीय तणाव पसरवणाऱ्यासाठी म्हणून अशा प्रकारची खोटी तक्रार दिल्याची कबुली कश्यपने दिली आहे.

पोलिस कोठडीमध्ये कश्यपच्या चौकशीदरम्यान त्याने स्वतः याबाबत कबुली दिली आहे. एका मीडिया हाऊसमध्ये क्रिएटिव्ह डायरेक्टर असलेल्या कश्यप याने ही सर्व खोटी कथा रचून मुंबईत जातीय तणाव पसरवण्यासाठी हे नाटक रचले होते. गोरक्षकांच्या विरोधात तक्रार करून देशातील धार्मिक वातावरण खराब करण्याचा प्रयत्न त्याने केला होता, असे पोलिसांनी सांगितले.
पुढील स्लाइड्सवर वाचा, वरुणने सांगितलेली संपूर्ण स्टोरी आणि प्रकरणाबाबत..
बातम्या आणखी आहेत...