आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंबेडकरांचा शाळा प्रवेश दिवस ‘विद्यार्थी दिन’ व्हावा, आमदार मानेंचा औचित्याचा मुद्दा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - डॉ बाबासाहेब आंबेडकर १२५ वे जयंती वर्ष मोठ्या प्रमाणावर साजरे करण्यात येत आहे. समाजातील अनेक घटकांचे दिवस या देशात साजरे केले जातात, परंतु समाजाचा अत्यंत महत्त्वपूर्ण घटक असलेल्या ‘विद्यार्थ्यांचा’ दिवस साजरा केला जात नाही. त्या पार्श्वभूमीवर डॉ. आंबेडकर यांचा ७ नोंव्हेंबर हा शाळा प्रवेश दिवस ‘विद्यार्थी दिवस’ म्हणून साजरा करण्यात यावा यासाठी डॉ. मिलिंद माने यांनी बुधवारी औचित्याच्या मुद्द्याद्वारे विधानसभेत मागणी केली.

डाॅ. अांबेडकर हे अाजीवन विद्यार्थी हाेते. अध्ययनाच्या क्षेत्रात एक उच्चतम अादर्श िनर्माण करतानाच त्यांनी अापल्या विद्या व्यासंगात कधीही खंड पडू िदला नाही. त्यामुळे ते जगताचे अादर्श विद्यार्थी ठरले अाहेत. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत उच्च पदव्या संपादन करतानाच केंब्रिज िवद्यापीठाने केलेल्या सर्वेक्षणातही ते जगातील नामवंत सर्वश्रेष्ठ १०० विद्यार्थ्यांमध्ये डाॅ. अांबेडकरांचे नाव प्रथम क्रमांकावर अाहे. त्यामुळे अादर्श विद्यार्थी कसा असावा यासाठी डाॅ. अांबेडकर यांच्या व्यतिरिक्त दुसरे नाव डाेळ्यासमाेर येत नाही. त्यांचे जीवन अाजच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक ठरेल. यासाठी त्यांचा शाळा प्रवेश िदवस ‘विद्यार्थी िदवस’ म्हणून साजरा करावा, अशी मागणी डाॅ. माने यांनी केली.
डाॅ. बाबासाहेब अांबेडकरांचा अादर्श डाेळ्यासमाेर ठेवून विद्या हेच विद्यार्थ्यांचे उन्नतीचे एकमात्र साधन अाहे. महाराष्ट्राच्या भूमीत फुले- शाहू-अांबेडकर जन्मास येऊन त्यांच्या हातून मानव कल्याणाची अनेक कार्ये त्यांच्या हातून घडली. महाराष्ट्र ही त्यांची कर्मभूमी अाहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने विद्यार्थी िदवसासाठी पुढाकार घेणे गरजेचे अाहे. डाॅ. बाबासाहेबांचा ७ नाेव्हेंबर हा शाळा प्रवेश िदवस शासकीय स्तरावर साजरा करण्याचा िनर्णय घेऊन तसे अादेश सर्व शाळांना द्यावेत. हा वेगळा पायंडा पडल्यास ताे विद्यार्थी जगताचा खराखुरा गाैरव ठरेल असेही डाॅ. माने यांनी सांिगतले.
बातम्या आणखी आहेत...