आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरात, कर्नाटकपेक्षा राज्यात जास्त गुंतवणूक, काँग्रेसचे आरोप चुकीचे : सुभाष देसाई

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- उद्योग गुंतवणुकीत महाराष्ट्र पिछाडीवर पडल्याचा काँग्रेसचा आरोप िबनबुडाचा आहे. गुजरात, कर्नाटकपेक्षा महाराष्ट्रात जास्त औद्योगिक गुंतवणूक झाली आहे. गुजरातमध्ये ६७४३ कोटींचे ४२, तर कर्नाटकात १५९९ कोटींचे १५ प्रकल्प आले आहेत. मात्र, महाराष्ट्रात ९१२२ कोटींचे ५९ प्रकल्प आले आहेत, असा दावा उद्योगमंत्री सुभाष देसाईंनी केला. काँग्रेसने दिलेली आकडेवारी खोटी व हेतुपुरस्सर आहे, असेही त्यांनी मंत्रालयात सांगितले. 
 
ते म्हणाले, ‘मेक इन इंडिया’ उपक्रमांतर्गत अनेक सामंजस्य करार झाले. यापैकी महाराष्ट्रातील ८ लाख कोटींंच्या करारांचा समावेश आहे. अनेक वेळा सामंजस्य करार फक्त कागदावरच राहतात. इतर राज्यांपेक्षा आपण गुंतवणुकीत पुढे आहोत. ४ लाख कोटींच्या गुंतवणुकीतून राज्यात ३१ हजार कोटींचे प्रकल्प उभे राहत आहेत. पुढील ३ ते ५ वर्षांत ७७ प्रकल्प पूर्णत्वास जातील आणि त्यामुळे राज्यात तब्बल ५४ हजार रोजगार निर्माण होतील. शिवाय, एमआयडीसीमधून दरवर्षी किमान २ लाख रोजगार निर्मिती होत असल्याचा दावाही देसाईंनी केला.    
 
फाॅक्सकाॅनने राज्यातून गाशा गुंडाळला    
फॉक्सकॉन कंपनीने महाराष्ट्रात गुंतवणुकीची तयारी दाखवली होती. मात्र, भारत-चीनमधील तणावपूर्ण संबंधांमुळे फाॅक्सकाॅनच्या गुंतवणुकीत अडथळा आला आहे.  सौर ऊर्जेवरील डेटा सर्व्हर स्टोरेजच्या उभारणीसह मोबाइल, टॅब्लेट, टीव्ही इत्यादींत फॉक्सकॉन समूह गुंतवणुकीसाठी उत्साही होता. पुणे, मुंबई परिसरात ३५ हजार कोटींची (५ अब्ज डॉलर्स) गुंतवणूक समूहाकडून हाेणार होती. या गुंतवणुकीमुळे ही कदाचित देशातील सर्वांत मोठी थेट परदेशी गुंतवणूक ठरली असती. पण तसे होऊ शकले नाही, अशी खंत देसाईंनी व्यक्त केली.
 
बातम्या आणखी आहेत...