आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्याच्या २५ साखर कारखान्यांचे ऊस गाळप वेळेआधीच पडले बंद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- ग्रामीण भागातील ग्राहकांवर नाेटाबंदीचा प्रभाव अद्याप कायम असून त्याचा परिणाम क्रयशक्तीवर झाला अाहे. त्यामुळे डिसेंबरअखेर साखरेचे उत्पादन ८०.९० लाख टन होऊनदेखील मागणी तुलनेने कमी राहण्याचा अंदाज भारतीय साखर महासंघाने व्यक्त केला अाहे. महाराष्ट्रात साखरेचे उत्पादन २५.२६ लाख टन झाले असून दुष्काळग्रस्त भागातील साखर कारखान्यांनी िनयाेजित वेळेच्या अाधीच गाळपाचे काम बंद केले अाहे.
  
यंदाच्या साखर हंगामात महाराष्ट्रातील १४७ साखर कारखान्यांनी ऊसगाळपाचे काम सुरू करून ३१ डिसेंबरअखेर २५.२५ लाख टन साखरेचे उत्पादन केले.  मागील वर्षातल्या याच कालावधीतील ३३.७० लाख टनांच्या तुलनेत यंदा राज्यातील साखरेचे उत्पादन घटले असल्याचे इस्माने म्हटले अाहे. 
 
वेळेअगाेदरच गाळप बंद  : महाराष्ट्रातील साखर कारखान्यांमध्ये साधारणपणे नाेव्हेंबरपासून एप्रिलपर्यंत ऊस गाळपाचे काम सुरू असते. परंतु दुष्काळामुळे यंदा ऊस उत्पादनाचे प्रमाण घटले अाहे. परिणामी, ऊस कमी प्रमाणात उपलब्ध असल्याने महाराष्ट्रातील दाेन डझनपेक्षा जास्त साखर कारखान्यांनी फेब्रुवारीमध्ये साखर हंगाम संपण्याअगोदरच गाळप बंद केले अाहे. त्यातून दुष्काळाचा सामना करावा लागलेल्या मराठवाडा, सोलापूर अाणि अहमदनगर या भागातील जवळपास २५ कारखान्यांनी गाळपाचे काम बंद केले अाहे. काेल्हापूर, सांगली, सातारा अाणि पुण्याला दुष्काळाचे चटके फारसे न बसल्याने या भागात ऊस गाळपाचा वेग मागील वर्षाप्रमाणेच कायम असल्याचे भारतीय साखर महासंघाने म्हटले अाहे.
  
उत्पादन घटण्याची भीती  : एक अाॅक्टाेबर ते एकतीस अाॅक्टाेबर या कालावधीत देशात ८०.९ लाख टन साखरेचे उत्पादन झाले असून ते मागील वर्षाच्या तुलनेत ०.४ टक्के जास्त अाहे. परंतु २०१६ -१७ या वर्षात देशात २.३४ काेटी टन साखरेचे उत्पादन हाेण्याचा अंदाज असून मागील वर्षाच्या तुलनेत त्यात सात टक्के घट हाेण्याची भीती इस्माने व्यक्त केली अाहे. पश्चिम अाणि दक्षिण महाराष्ट्रात साखरेचे उत्पादन कमी हाेण्याचा अंदाज अाहे.

नाेटाबंदीचा फटका   
अाॅक्टाेबर ते डिसेंबरच्या पहिल्या तिमाहीतील साखर हंगामामध्ये साखरेच्या उचलमध्येही माेठ्या प्रमाणावर घट झाली. नाेटाबंदीनंतर लग्न समारंभ किंवा काैटुंिबक कार्यक्रमाला कात्री लावण्यात अाली. याचप्रमाणे बिस्किट, चॉकलेट, आइस्क्रीमसारख्या पदार्थांची मागणी घटली. त्यामुळे साखरेच्या मागणीत जवळपास पाच लाख टनांनी घट झाली. परिणामी यंदाच्या वर्षात साखरेच्या मागणीत २५५ लाख टनांची कमी येण्याची शक्यता इस्माने वर्तवली अाहे. 
बातम्या आणखी आहेत...