आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IAS दाम्पत्य म्हैसकर यांच्या मुलाच्या मृत्यूला 24 तास उलटले, आत्महत्या की अपघात?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मन्मथ म्हैसकर (22) सकाळी 7 वाजता मित्राच्या घरी जात असल्याचे सांगून घराबाहेर पडला होता. - Divya Marathi
मन्मथ म्हैसकर (22) सकाळी 7 वाजता मित्राच्या घरी जात असल्याचे सांगून घराबाहेर पडला होता.
मुंबई - आयएएस दाम्पत्याचा मुलगा मन्मथच्या आत्महत्येला 24 तास उलटून गेल्यानंतरही पोलिसांच्या हाती काहीही ठोस माहिती लागलेली नाही. नगर विकास प्रधान सचिव मनीषा म्हैसकर आणि म्हाडाचे उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर यांचा मुलगा मन्मथ याचा मंगळवारी सकाळी मलबार हिल परिसरातील एका 20 मजल्यांच्या इमारतीवरुन पडून रहस्यमयरित्या मृत्यू झाला. पोलिसांना घटनास्थळावरुन फक्त मन्मथचा मोबाइल आणि बॅग सापडली. पोलिसांनी त्याचे व्हॉट्सअॅप मेसेज चेक केले आहे. त्यातून मन्मथ तणावात होता, असे काही जाणवत नसल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. त्यामुळे ही आत्महत्या आहे की अपघात असा प्रश्न उपस्थित होत आहे. 
 
काय आहे घटना...
भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी मनीषा म्हैसकर आणि मिलिंद म्हैसकर यांच्या 22 वर्षीय मुलाचा रहस्यमयरीत्या मृत्यू झाला आहे. मन्मथ असे त्याचे नाव असून मलबार हिल परिसरातील दरिया महल या वीस मजली इमारतीच्या छतावरुन उडी मारून त्यानेे आत्महत्या केल्याची माहिती आहे. मुंबई पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर आणि  म्हाडाचे उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर यांचा मन्मथ हा एकुलता एक मुलगा होता. मन्मथने  पुण्याच्या सिंबायाॅसिसमध्ये लाॅ साठी अॅडमिशन घेतली होती, काॅलेज सुरूही झाले होते. तो जीडी सोमाणी शाळेत शिकला होता.

मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास मलबार हिल परिसरात राहणाऱ्या अगरवाल नावाच्या मित्राकडे जात असल्याचे सांगत मन्मथ घरातून बाहेर पडला. मात्र अर्ध्या तासातच मन्मथने त्याचा मित्र राहत असलेल्या दरीया महल इमारतीच्या छतावरुन उडी टाकून आत्महत्या केल्याचा बातमी आली आणि एकच खळबळ माजली. 
 
दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास अत्यंत शोकाकूल वातावरणात चंदनवाडी स्मशानभूमीत मन्मथवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्रिमंडळातील इतर सदस्य हजर होते.
बातम्या आणखी आहेत...