आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मैला वाहण्याचे काम करत मरणार नाही; सुनील यादवचा निर्धार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- रात्रीच्या अंधारात मैला वाहून नेण्याचे काम अाणि दिवसाच्या उजेडात शिक्षण असा गेल्या एक तपापासूनचा न चुकता दिनक्रम करत बीकॉम, बीए जर्नालिझम, डीएसडब्ल्यू, एमएचडब्ल्यू, एमफिल, जागतिकीकरण अाणि कामगार विषयात पदव्युत्तर िशक्षण अशा सहा पदव्या संपादन केल्यामुळे सुनील यादव यांचे प्रसारमाध्यमांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून माेठ्या प्रमाणावर काैतुक झाले. मात्र, याच सहा पदव्या जाचक ठरत असल्याचे अलीकडच्या प्रशासकीय कारभारावरून उघड झाले अाहे. महापालिकेने त्यांची एका वाॅर्डातून दुसऱ्या वाॅर्डात बदली केली आहे. त्यामुळे वणवण भटकावे लागत आहे.   
 
सुनील यादव २००५ पासून मुंबई महानगरपालिकेमध्ये अनुकंपावर सफाई कर्मचारी म्हणून काम करत आहेत. यादव  पत्नी अाणि दाेन लहान मुलींसह चेंबूर येथे राहतात. त्यांनी यशवंतराव चव्हाण विद्यापीठातून २००५-०८ मध्ये बीकाॅमनंतर महाराष्ट्र टिळक विद्यापीठातून सामाजिक शास्त्र या विषयात एमए पदवी घेतली. टाटा सामाजिक विज्ञान संस्थेतून त्यांनी राज्य धाेरण अाणि कामगार या विषयात एमफिल केले. सध्या ते व्यवस्थापन अाणि कामगार विषयात पीएचडी करीत अाहेत. इतकेच नाही तर अापल्या बारावी उत्तीर्ण पत्नीलादेखील सामाजिक शास्त्रातील बीएची पदवी घेण्यास प्राेत्साहन देत आहेत.  अापल्या लाेकांना मुख्य प्रवाहात अाणण्याच्या हेतूने प्रेरित झालेले सुनील यादव हे दिवसा टाटा इन्स्टिट्यूटमध्ये व्याख्याते अाणि रात्री सफाई कामगार असे जीवन जगत अाहेत. 

यादव पीएचडीच्या कामासाठी १ ते ३१ जुलै या काळात सुटीवर हाेते. सुटीनंतर एक अाॅगस्टला कामावर रुजू झाल्यानंतर अचानक ‘डी’ वाॅर्डातून कार्यमुक्त केल्याचे पत्र अाले. पण जेव्हा एम वाॅर्ड (चेंबूर) येथे गेलाे असता बदलीसंदर्भात काेणतीही नाेटीस मिळालेली नसल्याचे सांगण्यात अाले. यासंदर्भात विचारणा केली असता पालिकेच्या अधिकाऱ्यांनी मला तुम्हाला नाेकरीवरून काढलेले नसून एम वाॅर्डाच्या जबाबदाऱ्यांमधून कार्यमुक्त केले असल्याचा खुलासा केला.अापल्याला अतिशय कमी वेतन मिळत असून सर्व कुटुंबाचा भार माझ्यावर अाहे. जर अाता नाेकरी गेली तर कुटुंबाचा सांभाळ कसा करणार, याची काळजी त्यांना लागली अाहे.   

भ्रष्ट अधिकाऱ्यांविरोधात मोहीम  
पीएचडीसाठी ५० पानांचा प्रोजेक्ट करून द्यावा लागतो; पण माझी फक्त आठ पाने झाली आहेत. त्यामुळे अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळणे गरजेचे आहे. माझी पीएचडी पूर्ण होऊ नये या मानसिकतेतूनच ही छळवणूक करण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला. मी दलित कुटुंबामधून अालाे अाहे. अाजही मला जातिव्यवस्था अाणि वर्णद्वेषाचा सामना करावा लागत अाहे. दलितांसाठी धाेरण बनवलेले असतानादेखील अाम्हाला त्याचा काेणताही फायदा न मिळणे ही अापल्या देशासाठी दुर्दैवी घटना अाहे. पालिकेतील अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नगरविकासमंत्री, सामाजिक न्याय विभाग, राष्ट्रीय सफाई कामगार आयोग यांना पत्र पाठवले आहे. परंतु अद्याप त्याचे उत्तर मिळालेले नसल्याचे यादव यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...