आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

करचुकवेगिरीला अाळा, वसुलीसाठी ठाेस याेजना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - कर वाचवण्यासाठी एखादी वस्तू कमी िकमतीत विक्री केल्याचे कागदाेपत्री सर्रास दाखवले जाते. पण अाता व्यापाऱ्यांना ही पळवाट काढणे मुश्कील हाेणार अाहे. कमी किमत दाखवून हाेणाऱ्या कर चुकवेगिरीला अाळा घालण्यासाठी ‘फेअर मार्केट प्राईस’ नुसार कर िनर्धारणा करण्यात येणार अाहे. त्याचप्रमाणे विविध प्रकरणांमुळे कर वसुलीमध्ये येणारे अडथळे दूर करण्यासाठी ठाेस उपाययाेजना अर्थसंकल्पात केली अाहे.

मूल्यवर्धित करप्रणाली सुटसुटीत करण्यावर भर दिला अाहे. करचुकवेगिरीच्या उद्देशाने बाजारभावापेक्षा कमी िकमतीत एखाद्या वस्तूची विक्री झालेली असल्यास अशा विक्रीची फेअर मार्केट प्राईसप्रमाणे कर िनर्धारणा करण्याचे अधिकार देण्याचा प्रस्ताव अाहे. विक्रीकरांतर्गत विवादीत प्रश्नासंदर्भात अायुक्तांकडून अादेश प्राप्त करण्याची तरतूद अाहे. करदात्यास व्यवहारानंतर वा व्यवहार हाेण्याअगाेदर विक्रीकर विभागाकडे विहित प्रकारच्या प्रश्नासंदर्भात अागाऊ अधिनिर्णय अादेश प्राप्त करण्यासाठी अर्ज करण्याची संधी देणारी तरतूद अाहे. या प्रश्नासंदर्भात अादेश देण्याचे अधिकार विक्रीकर अायुक्त अागाऊ अधिनिर्णय प्राधिकरण यांच्याकडे देऊ शकतील. या तरतुदीसंदर्भात मूल्यवर्धित कर कायद्यात बदल करण्याचा प्रस्ताव अाहे. विहित प्रश्नासंबंधात कलम ५६ रद्द करण्यात येऊन त्याखालील प्रलंिबत अर्ज देखील या प्रािधकरणाकडे वर्ग करता येतील. यामुळे कर वसुली हाेण्यास हातभार लागू शकणार अाहे.

करदात्याला नाेंदणीसाठी विक्रीकर विभागाला भेट देण्याची गरज नाही. नाेंदणीचे दस्तएेवज अाॅनलाईन पाठवायचे अाहेत. या दस्तएेवजामध्ये काही फरक अाल्यास सुनावणीची संधी न देता अर्ज नामंजूर करण्यात येईल. परंतु त्याबाबत ठराविक कालावधीत दुरुस्तीची संधी देण्याचा प्रस्ताव अाहे. या काळात त्रुटींची पूर्तता केल्यास मूळ अर्जाच्या तारखेपासून नाेंदणीपत्र देण्यात येईल. परंतु विहित कालावधीत त्रुटी दुरुस्त न केलास अर्ज िनरस्त हाेईल. खाेटे दस्तएेवज िदल्यास नाेंदणीक्रमांक रद्द करण्याची तरतूदही अाहे.
जास्त विवरणपत्रे
करदात्याने सादर केलेल्या विवरणपत्रामध्ये चूक अाढल्यास त्याला सुधारीत विवरणपत्र भरण्याची मुदत मूल्यवर्धित कायद्यामध्ये लेखापरीक्षण अहवाल सादर करण्याच्या तारखेपर्यंत करण्याचे व एकापेक्षा जास्त सुधारीत विवरणपत्रे दाखल करण्याचा प्रस्ताव अाहे.
बातम्या आणखी आहेत...