आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अॅसिड हल्ला पीडितांसाठी अमृता फडणवीसांसह बॉलीवूड तारका अवतरल्या रॅम्पवर, पाहा Photo

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अॅसिड हल्लापीडितांच्या पुनर्वसनासाठी दिव्यज फाउंडेशन आणि राज्याच्या महिला आयोगाकडून मुंबईत रविवारी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी कन्या दिविजासह रॅम्पवॉक केला. या वेळी चित्रपटसृष्टीतील कलाकारही उपस्थित होते. - Divya Marathi
अॅसिड हल्लापीडितांच्या पुनर्वसनासाठी दिव्यज फाउंडेशन आणि राज्याच्या महिला आयोगाकडून मुंबईत रविवारी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी कन्या दिविजासह रॅम्पवॉक केला. या वेळी चित्रपटसृष्टीतील कलाकारही उपस्थित होते.
मुंबई -  अॅसिड हल्ला करणाऱ्या अाराेपींना कडक शासन करण्यासाठी प्रसंगी कडक नियम करण्यात येईल. त्या दृष्टीने राज्य महिला अायाेगाने याेजना तयार करावी. अायाेगाने तयार केलेल्या याेजनेला सर्वताेपरी सहकार्य करून अाराेपींना कडक शासन करण्यासाठी कायद्यात बदल करून याेग्य ती कारवाई केली जाईल,  असे अाश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी केले.   
 
जागतिक महिला दिनाचे अाैचित्य साधून महाराष्ट्र राज्य महिला अायाेगाने अॅसिड हल्ल्यामुळे बाधित झालेल्या पीडितांसाठी पुनर्वसन कार्यक्रम हाती घेतला अाहे. दिव्याज फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेच्या वतीने वरळी येथे अॅसिड हल्ला पीडितांमध्ये नवी उमेद जागवण्यासाठी तसेच समाजात त्यांना प्रतिष्ठा मिळावी म्हणून काॅन्फिडन्स वाॅक या कार्यक्रमाचे अायाेजन करण्यात अाले हाेते. या वेळी ते बाेलत हाेते. या प्रसंगी विविध क्षेत्रांतील नामांकित व्यक्ती, उद्योजक आणि कलाकार उपस्थित हाेते. फडणवीस म्हणाले, अॅसिड हल्ला पीडित व्यक्ती या हल्ल्यातून ताकदीनिशी अापल्या अायुष्यात उभे राहिले अाहेत. मात्र, समाजाची जर साथ त्यांना मिळाली तर त्यांची जगण्याची उमेद अाणखी वाढेल, असेही ते म्हणाले.
 
पुढे वाचा, पंकजा मुंडे म्हणाल्या, पीडितांना प्रोत्साहन देण्याची  गरज, यासह पाहा रॅम्प वॉकचे Photos
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)  
बातम्या आणखी आहेत...