आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अाधी तिळगूळ वाटणार, मग गाेड-गाेड बाेलणार, भाजपने पाठवला युतीचा प्रस्ताव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मुंबईसह दहा महापालिका आणि जिल्हा परिषदांसाठी राज्यात युती करण्याचा प्रस्ताव भाजपने शिवसेनेला पाठवला असून त्यावर संक्रांतीनंतर चर्चा हाेणार अाहे. दरम्यान, शुक्रवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षातील प्रमुख नेत्यांशी ‘माताेश्री’वर चर्चा करून सर्व मंत्र्यांना प्रचारात सक्रिय हाेण्याचे अादेश दिले अाहेत. शिवसेना नेते अनिल देसाई यांनी ही माहिती दिली.

‘माताेश्री’वरील बैठकीला रामदास कदम, सुभाष देसाई, दीपक सावंत, विजय शिवतारे, अर्जुन खोतकर हे मंत्री,  खासदार अनिल देसाई आणि आमदार सुनील प्रभू,  अनिल परब अादी उपस्थित होते. सुमारे दाेन तास चाललेल्या या बैठकीत भाजपने पाठवलेल्या युतीच्या प्रस्तावावर सखोल चर्चा झाली. गेल्या वर्षी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेच्या मंत्र्यांनी प्रभावी प्रचार न केल्याने उद्धव ठाकरे प्रचंड नाराज झाले होते. शुक्रवारच्या बैठकीतही त्यांनी या मंत्र्यांना पुन्हा धारेवर धरले. 

आगामी महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकीत अशी चूक न करता शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांनी संपूर्ण राज्यात प्रचारसभा घ्याव्यात, असे आदेशही त्यांनी बजावले. स्वतः उद्धव ठाकरेही शहरी व ग्रामीण भागात प्रचाराला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
बैठकीनंतर बोलताना पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी सांगितले, ‘पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्व मंत्र्यांना ग्रामीण भागात प्रचाराला जाण्याचे कडक आदेश दिलेले आहेत. जिल्हा परिषद निवडणूक प्रचाराला सर्वांना जावेच लागेल. ग्रामीण भागात सभा घ्याव्याच लागतील. शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांना तळागाळात जाऊन प्रचार करावा लागेल. ते स्वतःही ग्रामीण भागात निवडणुकीत लक्ष घालणार आहेत.’
 
भाजपने पाठवला युतीचा प्रस्ताव
खासदार अनिल परब यांनी सांगितले, ‘भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी युतीचा प्रस्ताव पाठवला आहे. त्यानुसार आम्ही कामाला लागलो आहोत. युतीबाबत लवकरात लवकर चर्चेला आम्ही सुरुवात करणार आहोत. मात्र युती झाली तर ती सगळीकडे व्हावी ही आमची इच्छा आहे. भाजप पारदर्शी कारभाराबाबत बोलत आहे; परंतु गेल्या २० वर्षांपासून आम्ही त्यांच्यासोबतच आहोत. त्यामुळे पारदर्शकतेचा वेगळा अर्थ आम्हाला माहीत नाही.’
 
पुढील स्लाईडवर वाचा, ज्याच्या जास्त जागा त्याचाच महापौर : रावसाहेब दानवे......