आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमिरने सलमान-शाहरुखला टाकले मागे, \'सुलतान\'-\'रईस\' पेक्षा \'दंगल\' पाहाणाऱ्यांची संख्या जास्त

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- ‘दंगल’मुळे आमिर खान विदेशातही सर्वात जास्त व्यवसाय करणारा भारतीय अभिनेता झाला आहे. त्यात शाहरुख खान खूप मागे राहिला आहे. लोकप्रियता आणि व्यवसाय यात तो आमिर आणि सलमानपेक्षा खूप पुढे होता. ज्याचे चित्रपट विदेशी बाजारात ५० ते ६५ कोटी रुपयांपर्यंत व्यवसाय करत असत असा शाहरुख हा एकमेव अभिनेता होता. पण आता प्रेक्षक आणि चित्रपटगृह यांच्या वाढत्या संख्येमुळे हे चित्रही बदलले आहे. आमिरचा ‘थ्री इडियट्स’ आणि सलमानचा ‘बॉडीगार्ड’ विदेशी बाजारात गेम चेंजर ठरले. बॉक्स ऑफिस कलेक्शन, फुटफॉल यांच्या आधारे पाहिले तर साडेचार कोटी प्रेक्षकांनी दंगल, चार कोटींनी सुलतान आणि दोन कोटी लोकांनी रईस पाहिला. देशभरातील वितरक आणि चित्रपटगृह मालकांकडून ‘भास्कर’ने हे आकडे एकत्रित केले आहेत.
  
लोकप्रियता, व्यावसायिक आकड्यांतही आमिर व सलमान यांनी शाहरुखला मागे टाकले आहे. व्यवसायात शाहरुख मागे आहे. इंटरनेटवर चित्रपटांच्या व्यवसायात अजूनही बरोबरीची स्पर्धा आहे. आमिरचा शेवटचा चित्रपट पीके हा २०१४ मध्ये आला होता. पूर्ण दोन वर्षांनंतर दंगल आला. यादरम्यान सलमानचे २०१४ मध्ये किकनंतर ३ चित्रपट (बजरंगी भाईजान, प्रेम रतन धन पायो आणि सुलतान) आले. शाहरुखचे  २०१४ मध्ये हॅपी न्यू इयरनंतर ३ चित्रपट (दिलवाले, फॅन, रईस आणि डिअर जिंदगीत अतिथी कलावंत) आले. शाहरुखचा ‘फॅन’ पूर्णपणे फ्लॉप झाला होता. 
बातम्या आणखी आहेत...