आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वेतून उतरताना फलाटावरून महिला खाली पडली, 3 डबे सरकले, जास्त गॅपमुळे बचावली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इटारसी- जंक्शनच्या फलाट क्रमांक २ वर शनिवारी मोठी दुर्घटना टळली. सकाळी अकराच्या सुमारास फलाटावर राजकोट एक्स्प्रेस आली. त्यातील एक डब्यातून शिखा बर्मन ही महिला उतरत असताना रेल्वे पुन्हा सुरू झाली. यामुळे ती घसरून फलाट आणि रेल्वेच्या मध्ये अडकली. या दरम्यान रुळावरून तीन डबे पुढे सरकले. प्रवाशांनी साखळी ओढून रेल्वे थांबवली. फलाटाला चिकटून राहिल्याने महिलेला किरकोळ खरचटले, मात्र जीव वाचला. 
 
अशा घटनांत १० वर्षांत १२४ मृत्यू 
गेल्या दहा वर्षांत मुंबईच्या उपनगरांत रेल्वे रूळ व प्लॅटफाॅर्मच्या फटीत अडकून १२४ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. ५६४ प्रवासी जखमी झाले.
बातम्या आणखी आहेत...