आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगभ्रमंतीस निघालेला परभणीचा युवक अाॅस्ट्रेलियातच अडकला!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- “दुनिया की सैर  कर लो, अराउंड द वर्ल्ड इन एट डॉलर’ हे राज कपूर यांच्या ‘अराउंड द वर्ल्ड’ या चित्रपटातील गीत आपण सर्वांनीच ऐकलेय. हे केवळ चित्रपटातच शक्य असल्याचे आपल्याला वाटत असले तरी एका भारतीय तरुणानेही खिशात असलेल्या माेजक्या पैशांवरच पृथ्वी प्रदक्षिणा करण्याचा निर्धार केला आणि गेल्या ९ महिन्यांत चक्क ९ देश फिरलाही. जगाची भ्रमंती करणारा पहिला भारतीय व आशियाई व्यक्ती हाेण्याचा मान मराठवाड्यातील या शेतकऱ्याच्या मुलाला मिळू शकताे. मात्र, अाता पैशाची चणचण निर्माण झाल्याने हे स्वप्न अर्ध्यावर सोडून माघारी फिरण्याची वेळ त्याच्यावर ओढावली आहे.
    
परभणी जिल्ह्यातील कात्नेश्वर (ता. पूर्णा) गावच्या अल्पभूधारक शेतकऱ्याचा ३३ वर्षीय मुलगा विष्णुदास चापके हा जगभ्रमंतीवर निघालाय. गेल्या नऊ महिन्यांत त्याने चीन, म्यानमार, थायलंड, लाओस, न्यूझीलंड, आॅस्ट्रेलिया अशा देशांतील २४ हजार किमीचा प्रवास “लिफ्ट’ घेऊन  पूर्ण केलाय. ऑस्ट्रेलियाचा व्हिसा मिळवण्यासाठी येणारा खर्च तेथील एकाने प्रायोजित केला आहे. हा व्हिसा लवकरच संपणार असून  तेथून   चिलीस जाण्यासाठी त्याच्याकडे पैसे नाहीत. त्यामुळे सध्या ताे सिडनीतच अडकून पडलाय.  जर पुढील प्रवासासाठी पैशांची तरतूद झाली नाही, तर पृथ्वी प्रदक्षिणेची ही मोहीम अर्ध्यावर सोडून त्याला परतावे लागेल.  वाटखर्चासाठी प्राॅव्हिडंट फंडातील पैसे वापरले. मित्र, मैत्रिणींनी मदत केली आहे. बरेच फेसबुक फ्रेंड्सही त्याला मदत करताहेत. चिली, ब्राझील, पेरू,  इक्वेडोर, सेंट्रल अमेरिका, पनामा, अमेरिका, युरोपियन देश, तुर्की, पाकिस्तान आणि परत भारत असा त्याचा प्रवास बाकी आहे. याला किमान वर्षभर तरी लागेल. त्यासाठी पैसे बरेच लागणार आहेत. प्रत्येक देशाचा टुरिस्ट व्हिसा काढावा लागतो. त्यातच त्याचे सारे पैसे खर्च होतात.   

पृथ्वी प्रदक्षिणेचं पोराचं स्वप्नं पूर्ण व्हावं म्हणून स्वत: विष्णुदासने व त्याच्या आईवडिलांनी आजवरची सारी बचत खर्च करून टाकली. विष्णुदासला सिडकोच्या स्वप्नपूर्ती वसाहतीत सदनिका  लॉटरीत लागली होती.  मात्र, घराचे स्वप्न पूर्ण  झाले असताना ते घर विकत घेण्याऐवजी तो जगभ्रमंतीचे स्वप्न पूर्ण करायला निघाला अाहे.   

अाजवर लिफ्ट मागून केला प्रवास पूर्ण   
िवष्णुदास  पुण्याच्या फर्ग्युसन आणि एसपी काॅलेजचा विद्यार्थी. मुंबईत इंग्रजी दैनिकात पत्रकार म्हणून त्यानं काम केलंय.   गेल्या नऊ महिन्यांत ताे हाॅटेलमध्ये राहिलेला नाही. िमत्र, मित्रांचे िमत्र यांच्याकडे  तो मुक्काम करतो. विष्णुदास शाकाहारी आहे. त्याला इंग्रजीबरोबर थोडी पर्शियन व फ्रेंचही येते. त्याची िलफ्ट िमळवण्याची शक्कल भारी आहे. मोठ्या कागदावर जेथे जायचे ते ठिकाण तो  िलहितो आणि प्रमुख महामार्गावर  उभा राहतो. कोणीतरी थांबतं व िलफ्टही देतं. त्याला भाषेची अडचण वाटत नाही. स्थानिक भाषेतले ५० शब्दही संवादास पुरे, असं तो म्हणतो.   

स्वप्न पूर्ण व्हायला हवे - कमांडर दोंदे   
कमांडर दोंदे यांना िवष्णुदासच्या मोहिमेबाबत खात्री आहे. ‘विष्णुदासची पचनक्रिया उत्तम आहे. कुठलेही अन्न तो पचवू शकतो. पृथ्वी प्रदक्षिणेसाठी आवश्यक ते सर्व गुण त्याच्याकडे अाहेत. त्यामुळे त्याचे व त्या निमित्ताने भारताचे हे स्वप्न पूर्ण व्हायलाच हवे,’ अशा शब्दांत  कमांडर दोंदे यांनीही त्याला आर्थिक मदतीचे आवाहन केले आहे.  

आम्ही स्वप्नही पाहू शकलो नाही...   
‘अाम्ही अाजवर इतक्या हलाखीच्या परिस्थितीत जगलो की कुठले स्वप्नही पाहण्याचे धाडसच करू शकलो नाहीत. मात्र, माझा मुलगा एक स्वप्न पाहतोय, ते पूर्ण व्हावे म्हणून तरी आम्हाला जे शक्य आहे ते आम्ही करण्याचा प्रयत्न करताेय,’ अशा शब्दांत  शेषराव चापके या त्याच्या वडिलांनी भावना  व्यक्त केली. विष्णुदासच्या आईवडिलांनी गावाकडची अाठ एकर  शेतजमीन मुलाच्या स्वप्नासाठी चक्क िवकायला काढली आहे.    

कमांडर दिलीप दाेंदेंपासून प्रेरणा   
सागरी मार्गाने  पृथ्वी प्रदक्षिणा करणारे कमांडर दिलीप दोंदे यांची मुलाखत मुंबईतील एका इंग्रजी दैनिकाचा पत्रकार म्हणून विष्णुदासने केली होती. तेव्हापासून पृथ्वी प्रदक्षिणेचं खूळ त्याच्या डोक्यात घुसलं. खरेतर यासाठी प्रायोजक मिळवणे, अनेक प्रकारच्या पूर्वतयारी करणे यात वेळ न दवडता विष्णुदास पृथ्वी प्रदक्षिणेच्या वेडाने असा काही झपाटला की त्याने थेट प्रवासच सुरू केला.  १९ मार्च २०१६ ला त्यानं ठाण्यातून प्रस्थान केलं. आता तो आॅस्ट्रेलियातील सिडनीत पोहोचलाय. सध्या ताे तिथेच मुक्कामी अाहे.

शेतकऱ्यांना मदत करणार : विष्णुदास
विष्णुदास रोज जगभ्रमंतीवर  ब्लाॅग िलहितोय. या अनुभवांचे तो पुस्तकही करणार आहे. त्याच्या िवक्रीतून आलेले पैसे तो आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना देणार आहे. ‘माझ्या मोहिमेला समाज मदत करतोय, त्यांचं ऋण मला फेडायला पाहिजे,’ असं त्यावर िवष्णुदासचं म्हणणं आहे.    
 
बातम्या आणखी आहेत...