आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उल्हासनगरमध्ये माजी महापाैरांच्या गाडीवर हल्ला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई   - उल्हासनगर महापालिका निवडणुकीत मंगळवारी ७८ जागांसाठी उभ्या असलेल्या ४७९ उमेदवारांना निवडून देण्यासाठी एकूण ४ लाख ६ हजार ८७४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. बहुतांश ठिकाणी तिरंगी लढती  पार पडल्या. या ठिकाणी ४५ टक्क्यांवर मतदान झाले. उल्हासनगरच्या अामदार अाणि राष्ट्रवादी पक्षाच्या जिल्हाध्यक्ष ज्याेती कलानी, अाेमी टीमचे प्रमुख अाेमी कलानी, नारायण कलानी, पंचम कलानी यांनी मतदानाचा हक्क बजावला. 
 
माजी महापाैर अाशा इदनानी यांच्या गाडीवर झालेला हल्ला अाणि ज्येष्ठ नागरिकाला पाेलिसांकडून झालेल्या मारहाणीच्या घटनांमुळे मतदानाला गालबाेट लागले.  प्रभाग ९ च्या उमेदवार आणि माजी महापौर आशा इदनानी या सपना गार्डन परिसरात मतदानाला अाल्या असता जमावाने गाडीला घेराव घालून त्यांच्यावर दगडफेक केली.  याप्रकरणी आशा आणि राजू इदनानी यांनी पोलिसात तक्रार केली. ओमी कलानी आणि समर्थक विरोधी उमेदवारावर हल्ला करून दहशत माजवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप राजू इदनानी यांनी केला आहे. तर, वॉर्ड १७ मध्ये  मतदान करून जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकास पोलिसाने मारहाण केली. 

ज्येष्ठ नागरिकाचे घर मतदान केंद्रापासून १०० मीटर अंतराच्या आत होते. या नागरिकाला पोलिसाने घरी जाण्यास विरोध करत मारहाण करत त्यांना मतदान केंद्रापासून १०० मीटर अंतराच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.
 
 
बातम्या आणखी आहेत...