आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोशल मीडियावर लिहा बिनधास्त; अडकल्यास विमा संरक्षण, कंपनीकडून दंडाची रक्कम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सोशल मीडियावर एखादी घटना, विषय अथवा कुण्या व्यक्तीबाबत लिखाणातून व्यक्त होताना आता घाबरण्याची आवश्यकता भासणार नाही. कारण एखाद्या घटनेत अब्रुनुकसानीचा खटला झाल्यास विमा कंपनी त्या व्यक्तीस विमा संरक्षण देईल. कंपनी गुन्हा सिद्ध करणाऱ्या व्यक्तीस विम्याची पूर्ण रक्कम देईल. सध्या भारतात सोशल मीडिया युजर्सना विमा संरक्षण नाही.
बजाज अलायन्झ या क्षेत्रात विमा देणारी देशातील पहिली कंपनी होत आहे. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक तपन सिंहल यांनी यासंदर्भात माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, एखाद्या व्यक्ती सोशल मीडियावर पोस्ट किंवा कमेंटमुळे खटल्यात ओढला गेला आणि त्याच्यावर नुकसान भरपाई देण्याची वेळ आल्यास सायबर विमा त्यास विमा संरक्षण देईल.
आमची कंपनी वैयक्तिक सायबर विमा संरक्षण डिझाइन करत आहे. कॉर्पाेरेट्समध्ये अस्तित्वात असलेल्या सायबर विमा संरक्षणासारखे त्याचे स्वरुप असेल. विमा घेणाऱ्या व्यक्तीला प्रतिष्ठा, डाटा चोरी आणि खासगी, वित्तीय व संवेदनशील माहितीची चोरी झाल्याप्रकरणात संरक्षण मिळेल. इंटरनेट यूजर्सची वाढती संख्या आणि ऑनलाइन व्यवहाराच्या वाढत्या वापरामुळे नवे धोके निर्माण झाले आहेत. सोशल मीडिया व ई-कॉमर्स वेबसाइट्सवर बऱ्याच प्रमाणात खासगी माहिती असते. वैयक्तिक सायबर विमा पॉलिसीअंतर्गत फिशिंग, आयडेंडिटी थेफ्ट, सायबर स्टॉकिंग, शोषण आणि बँक अकाउंट्सच्या हॅकिंगला संरक्षण दिले जाईल. सध्या सायबर विमा आयटी फर्म्स, बँका, ई-कॉमर्स आणि औषध कंपन्यांना विकला जातो. याअंतर्गत कॉर्पाेरेट्सना प्रायव्हसी आणि डाटा चोरी, नेटवर्क सुरक्षा दाव्याचे संरक्षण मिळते. भारतात कॉर्पाेरेट्स कंपन्यांद्वारे सायबर विमा घेण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षांत वाढले आहे. देशात गेल्या तीन वर्षंात असे विमे विकले जात आहेत. सध्या या विम्यांची संख्या ५०० असल्याचा अंदाज आहे.

देशात हजार कोटींचा सायबर बाजार
भारतात सायबर विमा बाजार सुमारे १ हजार कोटी रुपयांचा असल्याचा अंदाज आहे. हे प्रमाण बाजारातील ७ ते १० टक्के भागाला संरक्षण पुरवते. देशात इंटरनेट युजर्सची संख्या वाढत आहे. त्यात नव्या युजर्सचा कल सोशल मीडियाकडे जास्त आहे.
बातम्या आणखी आहेत...