आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्यांची काॅलेजातच होणार मतदार नोंदणी; जन्मतारीख, निवासाचा पत्ता अर्जासाेबत द्यावा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
मुंबई - तरुण पिढी निवडणूक आयोगाच्या कार्यालयात जाऊन मतदार यादीत नोंदणी करीत नाही. ही बाब लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने राज्यातील सर्व महाविद्यालयांनीच १८ वर्षे पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना मतदार यादीत नोंदणी करण्याची सोय उपलब्ध करून द्यावी, असे आदेश दिले होते. 

गेल्या तीन-चार महिन्यांपासून यावर चर्चा सुरू होती. अखेर सरकारने त्यादृष्टीने सर्व महाविद्यालयांना मतदार नोंदणीचे काम करणे बंधनकारक केले अाहे. निवडणूक आयोगातील वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘दिव्य मराठी’ला ही माहिती दिली.  
 
दरवर्षी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये मतदार यादी पुनर्निरीक्षण कार्यक्रम हाती घेण्यात येतो. असे असतानाही मतदार यादीत, १ जानेवारीला १८ वर्षे पूर्ण झालेल्याची नोंद न होणे, नमुना क्रमांक ६, ७, ८ व ८ अ मध्ये माहिती भरूनही मतदार यादीत दुरुस्ती न होणे अशा त्रुटी निवडणूक आयोगाला आढळून आल्या. त्यामुळे अाता १८ वर्षे पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयातच मतदार यादीत नोंद करण्याची सोय उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.    अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, बारावीच्या परीक्षेला जवळजवळ ३६ लाख विद्यार्थी बसतात. बारावी पास विद्यार्थी वयाची १८ वर्षे पूर्ण केलेले असतात. या वयोगटातील तरुण-तरुणींची मतदार नोंदणी करणे शक्य होणार आहे. 
 
जन्मतारीख, निवासाचा पत्ता अर्जासाेबत द्यावा
एक जानेवारी रोजी १८ वर्षे पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांनी मतदार नाेंदणीसाठीचा अर्ज भरून महाविद्यालयातील या कामासाठी नियुक्त केलेल्या संबंधित अधिकाऱ्याकडे किंवा कर्मचाऱ्याकडे सादर करायचा आहे. हा अधिकारी वर्षातून दोन वेळा जमा झालेले अर्ज निवडणूक आयोगाच्या कार्यालयात जमा करू शकणार आहे. त्यामुळे  त्याच्यावर कामाचा जास्त बोजा पडणार नाही. विद्यार्थ्यांना अर्जासोबत जन्मतारीख आणि निवासाचा पुरावा द्यायचा असून १८ वर्षे पूर्ण झाले असून मतदार यादीत नाव नोंदवावे, असे हमीपत्रही भरून द्यावे लागणार आहे.
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...