आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीडसाठी 114 काेटी, परभणीसाठी 102 काेटी, तर शिर्डीसाठी 36 कोटी पाणीपुरवठा, मलनिस्सारण कामांसाठी 833 काेटी निधी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
file photos - Divya Marathi
file photos
मुंबई- राज्यातील नागरी क्षेत्राच्या विकासाला गती देण्यासाठी पाणीपुरवठा, मलनिस्सारण आणि उड्डाणपूल याबाबतच्या एकूण ८३३ काेटी ७१ लाख रुपये किंमतीच्या १२ प्रकल्पांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी मान्यता दिली. मराठवाड्यातील बीड, परभणी व नांदेड शहरांचा यात समावेश अाहे.
 
अमृत अभियानांतर्गत मलनिस्सारण प्रकल्पासाठी कल्याण-डोंबिवली आणि कोल्हापूर या दोन शहरांसाठी अनुक्रमे १५३ कोटी ३८ लाख आणि ७२ कोटी ४७ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. तर पाणीपुरवठा प्रकल्पांसाठी भिवंडी-निजामपूर शहरासाठी २०५ कोटी ५२ लाख, नांदेड-वाघाळा शहरासाठी २४ कोटी १२ लाख, परभणीसाठी १०२ कोटी ९४ लाख, बीडसाठी ११४ कोटी १९ लाख आणि शिर्डी शहरासाठी ३६ कोटी 65 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
 
 या सात प्रकल्पांची एकूण किंमत ७०९ कोटी २७ लाख रुपये इतकी आहे. या अभियानांतर्गत २०१५- १६ व २०१६- १७ च्या राज्य वार्षिक कृती आराखड्यातील २६ पाणीपुरवठा आणि एका मलनिस्सारण प्रकल्पास शासनाने यापूर्वीच मान्यता दिली आहे. तसेच महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत पाच प्रकल्पांच्या एकूण १२४ कोटी ४४ लाख रुपयांच्या प्रकल्पांना देखील मंजुरी देण्यात आली. 
 
यात पाणीपुरवठा प्रकल्पांसाठी लोणावळा नगरपरिषदेला ३३ कोटी ४८ लाख, अहमदपूर नगरपरिषदेला ४४ कोटी ५२ लाख, चिखलदरा नगरपरिषदेला ३ कोटी ८१ लाख, दोंडाईचा नगरपंचायतीला २० कोटी ९१ लाखांचे प्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत. तर मालेगाव महापालिकेला उड्डाणपुलाच्या निर्मितीसाठी २१ कोटी ७२ लाख रुपये निधी देण्यात आला आहे.
 
बातम्या आणखी आहेत...