आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

याकूबला फाशी दिल्‍याचे बनावट फोटो व्‍हायलर; पोलिस लावणार छडा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संग्रहित छायाचित्र - Divya Marathi
संग्रहित छायाचित्र
मुंबई- १९९३च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटांतील आरोपी याकूब मेमनला फाशी देतानाची बोगस छायाचित्रे सोशल मीडियावरून सर्रास प्रसारित केली जात आहेत. असा खोडसाळपणा करणाऱ्यांचा मुंबई पोलिस शोध घेत आहेत. तसेच फाशीच्या दिवशी विविध ठिकाणी केलेल्या व्हिडिओ चित्रीकरणाचेही पोलिसांकडून विश्लेषण केले जात आहे. याकूबचा मृतदेह मुंबईत आणल्यापासून त्याच्या अंत्ययात्रेत कोण कोण सामील झालेल्यांमध्ये होते हेसुद्धा तपासून बारकाईने पाहिले जात आहे.

फाशीच्या दिवसापासून गेले दोन दिवस शहरातील कायदा-सुव्यवस्था राखण्यात गुंतलेल्या मुंबई पोलिसांनी आता या संपूर्ण घडामोडींचे विश्लेषण करण्यास सुरुवात केली आहे. याकूबला फाशी देतानाची बोगस छायाचित्रे सोशल मीडियावरून प्रसारित करणाऱ्यांकडे सर्वात प्रथम मुंबई पोलिसांनी आपला मोर्चा वळवला आहे. फाशीच्या दिवशी व्हॉट्सअॅप, फेसबुक, ट्विटर आणि यूट्यूबसारख्या सोशल मीडियातून याकूबला फाशी देतानाची दोन छायाचित्रे प्रसारित झाली होती. त्यापैकी एका छायाचित्रात काळ्या कपड्यात चेहरा झाकलेली आणि गळ्यात फास अडकवलेली एक व्यक्ती दिसत असून आजूबाजूला पोलिस आणि काही अधिकारी दिसत आहेत. तर दुसऱ्या छायाचित्रात तीच व्यक्ती फासावर लटकलेल्या अवस्थेत दिसत आहेत. मात्र ही दोन्ही छायाचित्रे बोगस असून ती ‘क्लायमेक्स अटॅक ऑफ २६/११' या यूट्यूबवरील एका माहितीपटातील असल्याची माहिती पोलिस उपायुक्त धनंजय कुलकर्णी यांनी "दिव्य मराठी'ला दिली.