आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना मंत्रालयात आली चक्कर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मणक्याचे दुखणे व आतड्याशी निगडित आजारांनी त्रस्त असलेले राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे मंगळवारी सायंकाळी मंत्रालयात चक्कर येऊन कोसळले. सहाव्या मजल्यावरील त्यांच्या दालनात हा प्रकार झाला. डाॅक्टरांना तातडीने पाचारण करण्यात आले. प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना त्यांच्या बंगल्यावर नेण्यात आले.    

मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीचा दिवस असल्याने मंत्रालयात मोठी गर्दी होती. सदाभाऊंना भेटण्यासाठी अनेक लोक त्यांच्या दालनात आले होते. लोकांना भेटत असतानाच त्यांना चक्कर अाली. अधिकारी व कर्मचारी यांनी त्वरित डाॅक्टरांना बाेलावले. यापूर्वीही सदाभाऊंना दौऱ्यावर चक्कर आली होती. 
बातम्या आणखी आहेत...