आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोटाबंदीमुळे नुकसान झालेल्या सर्वांनाच भरपाई द्या : सावंत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
मुंबई - नोटाबंदीच्या काळात झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून टोलचालकांना राज्य सरकार १४२ कोटी रुपयांची नुकसान भरपाई देणार आहे. मुख्यमंत्र्यांनी टोलचालकांना नुकसान भरपाई देण्याऐवजी देशभक्ती शिकवावी आणि नोटाबंदीमुळे नुकसान झालेल्या सगळ्यांनाच नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी शनिवारी केली.   
 
सावंत म्हणाले, नोटाबंदीच्या कालावधीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या जनतेला ५० दिवस त्रास सहन करून देशभक्ती दाखवावी, असे आवाहन केले होते. नोटाबंदीदरम्यान अनेक जणांचा बँकेच्या रांगेत उभे असताना मृत्यू झाला होता. या निर्णयामुळे अनेक जण बेरोजगार झाले. शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल मिळेल त्या भावाला विकावा लागला. सोयाबीनचा हमीभाव २७७५ रु. प्रतिक्विंटल असताना १२००-१३०० रु. प्रतिक्विंटल भावाने विक्री करावा लागला. कापूस उत्पादक शेतकऱ्यांचेही प्रचंड नुकसान झाले. .   
 
टोलमुक्त महाराष्ट्राची वल्गना करणाऱ्या भाजपचा दुतोंडीपणा यातून दिसून आला आहे. फक्त टोलचालकांनाच नुकसान भरपाई का, असा प्रश्न करून सर्वसामान्यांच्या नुकसानीची भरपाई सरकारने आधी द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.
बातम्या आणखी आहेत...