आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लेडीज बार बंद पाडणारा आक्रमक शिवसैनिक बनला विधानसभा विरोधीपक्ष नेता!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ठाणे जिल्ह्यातील कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघ हा शिवसेना नेते आणि विरोधीपक्ष नेते एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला आहे. कार्यकर्त्यांची मजबूत फळी आणि कुशल संघटनाच्या जोरावर एकनाथ शिंदे यांनी ठाणे जिल्ह्यात शिवसेनेचा भगवा फडकावला आहे.
एकनाथ शिंदे यांचा जन्म एका मध्यम वर्गीय कुटूंबात झाला. त्यामुळे कधी रिक्षा चालवून तर कधी बॉम्बे बिअर कंपनीत नोकरी करुन शिंदे संघर्ष केला. तसेच वागळे इस्टेटमधील मत्स्य कंपनीमध्ये लेबर कॉन्ट्रक्ट करुन स्वतः सकाळी सहा वाजता मासे सोलण्याचे काम करत समाजसेवेचे व्रत स्विकारले. तेव्हापासूनच दिवसातील 18 तास काम करण्याची सवय त्यांनी स्वत:साठी लावून घेतली. सतत प्रयत्न करणारा हा तरुण शिवसेना प्रमुखांच्या विचारांना प्रेरीत होऊन उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आनंद दिघे यांनी घालून दिलेले समाजकरणाचे धडे आजही एकनाथ शिंदे गिरवताना दिसत आहे.

एकनाथ संभाजी शिंदे यांनी किसन नगरमध्ये सामाजिक कार्ये करताना शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या कार्यापासून प्रेरीत होऊन शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांची विधानसभा विरोधीपक्षनेतेपदी निवड झाली आहे. यानिमित्त शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या जीवनकार्याचा घेतलेला आढावा...

पुढील पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा, एकनाथ शिंदेंच्या जिगरबाज कामगिरीला मिळाली होती शाबासकी...