आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विरोधकांबद्दल तोलून-मापून बोलले पाहिजे, शरद पवारांचा पंतप्रधानांना सल्ला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई / नवी दिल्ली - पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर कठोर हल्ला केला होता, त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे (एनसीपी) अध्यक्ष आणि केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी पंतप्रधानांना तोलून-मापून बोलण्याचा सल्ला दिला आहे. ते म्हणाले, 'पंतप्रधानांनी शब्दांची निवड काळीजीपूर्वक केली पाहिजे, तसेच विरोधकांवर संयमाने बोलले पाहिजे.'
शुक्रवारी दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांना मोदींबद्दल विचारण्यात आलेल्या एका प्रश्नावर ते म्हणाले होते, 'मोदी पंतप्रधान होणे देशासाठी घातक आहे.' यावर भाजपने आक्षेप घेतला होता. आता, युपीएचे घटक पक्ष असलेल्या एनसीपीच्या अध्यक्षांनीही पंतप्रधानांनी सांभाळून बोलले पाहिजे, असे म्हटले आहे. एनसीपीची दोन दिवसीय आढावा बैठक मुंबईत झाली त्यानंतर सोमवारी पत्रकार परिषदेत ते म्हणाले, राजकारणात कठोर शब्दांचा वापर टाळला पाहिजे. सहकारी पक्ष असतील किंवा विरोधक, यांच्या विरोधात बोलताना संयम बाळगला पाहिजे.
दुसरीकडे पंतप्रधानांच्या वक्तव्याचे काँग्रेसकडून समर्थन केले जात आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री मनीष तिवारी म्हणाले, पंतप्रधान जे बोलले ते सत्य आहे. शरद पवारांबद्दल आम्हाला आदर आहे, मात्र, पंतप्रधानांनी गुजरातमधील सत्य परिस्थितीच सांगितली आहे.
पंतप्रधानांच्या मोदींवरील टीकेवर बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला मात्र, त्यांनी यावर बोलण्यास नकार दिला आहे.

पुढील स्लाइडवर, शीला दीक्षितांप्रमाणेच महाराष्ट्रात शरद पवारांचा पराभव करायच होता