आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रत्यारोपणासाठी हृदय मुंबईत; गर्दीतही २० किमी अंतर १८ मिनिटांतच कापले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबई विमानतळ ते मुलुंड हे वीस किलोमीटरचे अंतर ऐन गर्दीच्या वेळेत मुंबईच्या रस्त्यांवरून अवघ्या १८ मिनिटांत कापून प्रत्यारोपणासाठी पुण्याहून आणलेले हृदय मुंबईच्या फोर्टीस रुग्णालयात पोहोचवण्यात आले. मुंबईतील ही पहिलीच हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया होती. रुग्णालय प्रशासन, मुंबई पोलिस आणि नौदलाच्या एकत्रित प्रयत्नांमुळे ही कामगिरी फत्ते झाली.

पुण्यातील एका ब्रेन डेड रुग्णाचे हृदय प्रत्यारोपणासाठी मुलुंडच्या फोर्टीसमध्ये पोहोचवायचे होते. त्यासाठी मुंबई विमानतळ ते फोर्टीसपर्यंत अॅम्ब्युलन्ससाठी वाहतूक पोलिसांनी 'ग्रीन झोन' तयार केला. त्यामुळे ३. ३० वाजता नौदलाच्या विशेष विमानाने आणलेले हे ह्रदय ३. ४८ वाजता म्हणजेच १८ मिनिटांत २० किमी अंतरावरील रुग्णालयात पोहोचले.त्यानंतरच्या बारा मिनिटात म्हणजे ४ वाजता प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली.
बातम्या आणखी आहेत...