आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Next Year In Aurangabad National Law University Starts

पुढच्या शैक्षणिक वर्षी औरंगाबादेत राष्ट्रीय विधी विद्यापीठ सुरु

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - औरंगाबाद येथे पुढील शैक्षणिक वर्षापर्यंत राष्ट्रीय विधी विद्यापीठ स्थापन करण्यात येईल, असे आश्वासन उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शुक्रवारी विधान परिषदेत दिले. राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण यांनी याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. तावडे म्हणाले, विधी विद्यापीठ स्थापन करण्याबाबतची प्रक्रिया थांबली आहे. मात्र, बंगळुरू विद्यापीठाच्या धर्तीवर विधी विद्यापीठाचे कुलगुरू निवृत्त न्यायाधीश असावेत. या प्रकारची व्यवस्था या विद्यापीठाच्या कायद्यात आहे.
मात्र, त्याबाबत गैरसमज निर्माण झाल्याने प्रक्रिया थांबल्याचेही तावडे यांनी स्पष्ट केले. सरकारने पुणे, नागपूर येथे आयआयटी स्थापण्याच्या घोषणा केल्या. मात्र, त्यावरही निर्णय होत नाही. मात्र, औरंगाबादजवळील करोडी येथे विधी विद्यापीठाचा निर्णय २००७ मध्ये घेण्यात आल्यानंतरही कार्यवाही का होत नाही, असा सवाल चव्हाण यांनी केला होता. कुलगुरू पदासाठी काही अडचणी असतील तर त्यासाठी कायद्यात दुरुस्ती करावी, अशी मागणीही चव्हाण यांनी केली.