आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

झाकीरच्या मुंबईतील १२ ठिकाणांवर धाडी, देशविघातक कारवाई कायद्यांतर्गत गुन्हे दाखल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - झाकीर नाईकच्या इस्लामिक रिसर्च फाउंडेशन या संस्थेवर केंद्रीय मंत्रिमंडळाने बंदी लादल्यानंतर आता राष्ट्रीय तपास संस्था म्हणजेच एनआयने आरआरएफ भोवतालचा फास आवळायला सुरुवात केली. शुक्रवारी आयआरएफच्या विरोधात देशविघातक कारवाई प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हे दाखल केल्यानंतर शनिवारी एनआयएने मुंबईतील त्यांच्या १२ ठिकाणी धाडी टाकल्या. सुमारे १२ लाख रुपये जप्त केले.
राष्ट्रीय तपास संस्था, सीबीआय आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने नाईकची कार्यालये आणि संस्थेच्या मुख्यालयाची तपासणी केली होती. या तपासणीदरम्यान झाकीर नाईकच्या विरोधात अनेक भक्कम पुरावे सापडल्याचा दावा करण्यात येत होता. तसेच आपल्या पीस टीव्ही या आंतरराष्ट्रीय वाहिनीवरूनही तो चिथावणीखोर आणि दहशतवादाला प्रोत्साहन देणारी भाषणे देत असल्याच्या चित्रफितीही सापडल्या होत्या. तरुणांची माथी भडकवून दहशतवादाला खतपाणी घातल्याच्या आराेपाखाली महाराष्ट्रातील अनेक पोलिस ठाण्यांत नाईकविरोधात गुन्हे दाखल आहेत. शुक्रवारी एनआयएने झाकीर नाईकवर देशविघातक कारवाया प्रतिबंधक कायद्याच्या कलम १०, १३,१८ अंतर्गत आणि भादंविच्या कलम १५३ (अ) अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. लगेच या धाडी टाकण्यात आल्या.
बांगलादेश अतिरेकी हल्ल्यानंतर चौकशीच्या फेऱ्यात
ढाका येथील रेस्तराँवर झालेल्या हल्ल्यात २० नागरिक ठार झाले होते. या हल्ल्यात सामील अतिरेक्याने आपण झाकीर नाईकच्या भाषणांनी प्रभावित झाल्याची कबुली दिल्यानंतर नाईकच्या विरोधात विविध तपास यंत्रणा सक्रिय झाल्या होत्या. तत्पूर्वी इसिसच्या वाटेवरील मुंबई आणि केरळ येथील काही तरुणांच्या चौकशीतूनही झाकीर नाईकच्या चिथावणीखोर भाषणांचे संदर्भ आढळले होते.
बातम्या आणखी आहेत...