आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अबू सालेमच्या लव्हस्टोरीवर येत आहे नॉव्हेल; यामुळे चर्चेत आला हा प्रशासकीय अधिकारी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- सन 1993 मध्ये मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोट खटल्यात अबू सालेम याला कोर्टाने जन्मठेप सुनावली आहे.  अबू सालेम यांच्या लव्ह स्टोरीवर एका प्रशासकीय अधिकारीने पुस्तक लिहिले आहे. पुस्तकात जिवंतपणा येण्यासाठी तुरुंगात जाऊन अबू सालेमची भेट घेण्याचाही प्रयत्न केला. परंतु त्याला यात यश आले नाही. या पुस्तकात लेखकाने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.

नेमके काय लिहिले आहे पुस्तकात...?
- नियाज अहमद खान असे लेखकाचे नाव असून ते मध्यप्रदेशातील गुना जिल्ह्याचे अॅडिशनल डिस्ट्रिक्ट मजिस्ट्रेट (ADM) आहेत.
- आपल्या नॉव्हेलवर चर्चा करताना नियाज खान यांनी सांगितले की, अबू सालेमच्या लाईफस्टाइलवर ते नेहमी इम्प्रेस होत होते. अबूचे वडील एक वकील होते. त्याची आई प्रचंड धार्मिक होती. मग अबू सालेम हा अंडरवर्ल्ड डॉन बनला कसा? या प्रश्नाने खान यांच्या डोक्यात अक्षरश: पिंगा घातला होता.
- त्यांनी याबाबत अधिक माहिती जाणून घेतली असता त्यातून एक रंचक माहिती समोर आली. त्यांनी 'लव्ह डिमांड ब्लड' या शीर्षकाखाली पुस्तक लिहिण्यास सुरुवात केली. या संदर्भात खान यांना अबू सालेमची तुरुंगात भेट घ्यायची होती. परंतु सरकारने त्यांना परवानगी दिली नाही.
- 380 पानांचे हे पुस्तकर फेब्रवारी-मार्च 2018 मध्ये जगासमोर येईल.

अबू 15 वर्षाचा असतानाच त्याच्या दिसत होता 'डॉन'
- अबू सालेम एक महत्त्वाकांक्षी व्यक्ति आहे. आझमगडमध्ये त्याचा जीव गुदमरत होता. जगावेगळे करण्याची त्याची लहानपणापासूनच इच्छा होती. 13 वर्षाचा असतानाच त्याने घर सोडले होते.
- दिल्लीत त्याने मोटर मॅकॅनिकचे काम केले. नंतर मुंबई आला. जोगेश्वरीत त्याने सुरुवातील टॅक्सी चालवली.
- दुकानावरही काम केले. त्याच्या दुकानासमोर अजीज टिंगा हा येऊन बसत होता. तो गुजरातमधील नामी स्मगलर होता.
- अजीज टिंगा हा अबूला एक टक पाहायचा. एके दिवशी अबूने टिंगाला हटकले. 'तू मुझे घूर-घूरकर क्यों देखते हो?'
- त्यावर टिंगाने उत्तर दिले 'मुझे तुममें में भविष्य का डॉन दिखाई देता है'
- त्यानंतर दोघांची चांगली मैत्री झाली.
- नंतर अबू मागे वळून पाहिले नाही. अबूने दाऊदसोबत मुंबईवर राज केले.
- 6 डिसेंबर 1992 रोजी बाबरी मशिद विध्वंस झाल्यानंतर 12 मार्च 1993 रोजी मुंबईत सीरियल ब्लास्ट झाले. त्यात अबू सालेमचा महत्त्वाचा रोल होता.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा... संबंधित फोटो...
बातम्या आणखी आहेत...