आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत नायजेरियन तरुणाचा खून, नालासोपाऱ्यातील खोलीत आढळला मृतदेह

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सात महिन्‍यांपासून एका खोलीत किरायाने राहणाऱ्या नायजेरियन तरुणाचा खून झाल्‍याची घटना शुक्रवारी उघडकीस आली. डॅनियल हेन्री असे मृताचे नाव आहे. तो नालासोपारा परिसरातील मारेगावमधील ‘अष्टविनायक’ इमारतीच्या रूम नंबर 302 रुमध्‍ये राहत होता.
खोलीतून दुर्गंधी असल्‍याची शेजाऱ्यांनी केली होती तक्रार
> हेन्री डिसेंबर 2015 पासून या ठिकाणी किरायाने राहत होता.
> काही दिवसांपासून त्‍याच्‍या खोलीचा दरवाजा आतून बंद होता.
> मात्र, शेजाऱ्यांनी त्‍याकडे दुर्लक्ष केले.
> पण, दोन दिवसांपासून त्‍याच्‍या खोलीतून दुर्गंधी येत होती.
> त्‍यामुळे संशय आल्‍याने शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली.
> पोलिसांनी दरवाजा तोडून आता प्रवेश केला असता कुजलेल्‍या अवस्‍थेत हेन्रीचा मृतदेह आढहला.
बातम्या आणखी आहेत...