आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जुहू विमानतळावर नाइट लँडिंग सुविधा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - दिवसभर हेलिकाॅप्टरच्या सेवांनी व्यग्र असलेल्या जुहू विमानतळावर नाइट लँडिंग सुविधा उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात अाहे. तसेच विमातळावरील धावपट्टीचा विस्तार करण्याचा प्रस्तावदेखील विचाराधीन अाहे.

जुहू येथे १९२७ मध्ये बांधण्यात अालेला मुंईतील हा सर्वात जुना विमानतळ अाहे. ३३८५ एकर जागेवर हे विमानतळ असून ३३ विमान कंपन्या येथे कार्यरत अाहेत. प्रारंभी या विमानतळावर लहान विमाने उतरत. परंतु विमानांच्या वाढत्या अाकारामुळे नंतर या विमानतळाचा वापर हा फक्त हेलिकाॅप्टर सेवेसाठी मर्यादित झाला. या विमानतळावरून रात्रीच्या वेळी उड्डाणाची सुविधा नाही. नाइट लँडिंग सुविधा उपलब्ध करून देण्यासाठीचा प्रस्ताव संबंिधतांनी स्वीकारला अाहे. या प्रस्तावाला अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर पाच ते सहा महिन्यांत त्याची अंमलबजावणी केली जाईल, असे भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे संचालक डाॅ. एम.के. बिमल यांनी सांगितले. या विमानतळावरून दिवसभरात १०० ते १२० फेऱ्या हाेतात. सार्वजनिक क्षेत्रातील अाेएनजीसी कंपनीच्या समुद्रात तेल आणि वायू उत्खननासाठी उभारण्यात अालेल्या तेल विहिरींवर कंपनीच्या कर्मचाऱ्यांची ने-अाण करण्यासाठी या विमानतळाचा प्रामुख्याने उपयाेग केला जाताे. त्याचबराेबर एअर अॅम्ब्युलन्ससाठी वापर वाढला अाहे. फेब्रुवारी, मार्च महिन्यात या फेऱ्यांनी २००चा टप्पा अाेलांडला असल्याचे बिमल म्हणाले. एअर अॅम्ब्युलन्सबाबत अातापर्यंत इतकी जागरूकता नव्हती. परंतु हृदयराेपण, अवयवरोपणासारख्या अाणीबाणीच्या काळात ही सेवा अत्यंत फायदेशीर ठरत असल्याचे लाेकांना पटू लागले अाहे.

विमानतळाच्या धावपट्टीचा विस्तार विचाराधीन
विकास याेजनेचा एक भाग म्हणून जुहू विमानतळावरील धावपट्टीचा विस्तार करण्याचाही विचार अाहे. जुहू समुद्रकनाऱ्यापर्यंत प्राधिकरणाची जमीन असल्याने त्या दिशेने धावपट्टीची लांबी वाढवण्याचा प्रस्ताव अाहे. या याेजनेला अंतिम मंजुरी मिळाल्यानंतरच या विस्तारातील अडथळे दूर करण्याचा विचार करण्यात येईल. त्यामुळे धावपट्टीचा विस्तार, काेणत्या प्रकारची विमाने उड्डाण करतील याबाबत अाताच सांगता येणार नाही, असे बिमल यांनी स्पष्ट केले.
बातम्या आणखी आहेत...