आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘सेन्सॉर’ अध्यक्षपदावरून निहलानी यांना हटवले, ख्यातनाम गीतकार प्रसून जोशी नवे अध्यक्ष

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- वादाच्या भाेवऱ्यात अडकलेले पहलाज निहलानी यांची सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षपदावरून शुक्रवारी उचलबांगडी करण्यात अाली. त्यांच्या जागी ख्यातनाम गीतकार प्रसून जोशी यांची केंद्र सरकारने नियुक्ती केली अाहे. 

चित्रपटामध्ये जी दृश्ये कापण्याचा आग्रह निहलानी धरतात त्यामागे कोणताही तर्क नसतो, असा आरोप अनेक निर्माते, दिग्दर्शकांनी केला होता. मधुर भांडारकर यांनी दिग्दर्शित केलेला इंदू सरकार  तसेच लिपस्टिक अंडर माय बुरखा अादी चित्रपटांमध्ये महिलांच्या लैंगिक जीवनाबद्दल चित्रण असून त्यासंदर्भात निहलानी यांनी काही आक्षेप घेतले होते. या दोन चित्रपटांना सेन्सॉरचे प्रमाणपत्र देण्यास त्यांनी नकार दिला होता. त्यांनी जानेवारी २०१५मध्ये सूत्रे स्वीकारली होती. दोन वर्षांहून अधिक काळ त्यांच्या कारकीर्दीत अनेक वाद निर्माण झाले.
बातम्या आणखी आहेत...